Shirur Loksabha Election Result : राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाचे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे हे आघाडीवरआहेत पहिल्या फेरीपासून त्यांनी घेतलेली आघाडी ही सहाव्या फेरी पर्यंत कायम आहे. सातव्या फेरीत कोल्हे यांना १ लाख ८५ हजार २३३ मते मिळाली तर आढळराव पाटील यांना १ लाख ५२ हजार ०३ मते मिळाली. तर २ हजार ४१९ जणांनी नोटाला पसंती दिली.
शिरूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरस पहायला मिळाली. डॉ. कोल्हे यांनी शरद पवार यांची साथ न सोडता ते त्यांच्या सोबत राहिले. तर अजित पवार यांच्याकडे उमेदवार नसल्याने शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना शिरूर मतदार संघातून तिकीट देण्यात आले. तसेच पाटील यांच्या साठी अनेक प्रचार सभा घेऊन अमोल कोल्हे या मतदार संघातून कसे निवडून येतात अशी भाषा अजित पवार यांनी केली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते.
आज सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा पासून डॉ. कोल्हे हे आघाडीवर होते. सुरवातीला त्यांनी ५ हजारांची आघाडी घेतली होती. ही आघाडी हळू हळू वाढत गेली. सहाव्या फेरीअखेर अमोल कोल्हे यांना १ लाख ८५ हजार २३३ मते मिळाली. तर आढळराव पाटील यांना १ लाख ५२ हजार ०३ मते मिळाली. अद्याप मतमोजणी सुरू असून कोल्हे यांनी घेतलेली आघाडी आढळराव पाटील तोडणार का या कडे आता लक्ष लागून आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या आता पर्यंत ६ फेऱ्या पार पडल्या आहेत. यातील पहिली फेरीत ३६६ मते ही नोटाला मिळाली तर दुसऱ्या फेरीत ७३६, तिसऱ्या फेरीत १ हजार ११७, चौथ्या फेरीत एकूण १ हजार ३५४, पाचव्या फेरीत २०३३, तर सहव्या फेरीत नोटाला २ हजार ४१९ मते मिळाली.
संबंधित बातम्या