sharad pawar warning : शरद पवार म्हणतात मला लक्षात ठेवा, मी सोडत नाही; विरोधकांना पवारांचा गर्भित इशारा
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  sharad pawar warning : शरद पवार म्हणतात मला लक्षात ठेवा, मी सोडत नाही; विरोधकांना पवारांचा गर्भित इशारा

sharad pawar warning : शरद पवार म्हणतात मला लक्षात ठेवा, मी सोडत नाही; विरोधकांना पवारांचा गर्भित इशारा

Mar 07, 2024 03:29 PM IST

Sharad Pawar warns Sunil Shelke : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी आज लोणावळा इथं बोलताना अजित पवार (Ajit Pawar) समर्थक आमदार सुनील शेळके यांना निर्वाणीचा इशारा दिला.

शरद पवार म्हणतात मला, सोडत नाही; विरोधकांना पवारांचा गर्भित इशारा
शरद पवार म्हणतात मला, सोडत नाही; विरोधकांना पवारांचा गर्भित इशारा (HT_PRINT)

Sharad Pawar Speech at Lonavala : ‘लोणावळ्याच्या मेळाव्याला जाऊ नये म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात आल्याचं मला कळलं आहे. यावेळी मी सोडून देतो, पण पुन्हा असं झालं तर शरद पवार म्हणतात मला हे लक्षात ठेवा,’ असा कडक इशारा शरद पवार यांनी आज अजित पवार (Ajit Pawar) समर्थक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आज लोणावळ्यात पार पडला. त्या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी देशातील व राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. या मेळाव्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थानिक आमदारानं धमक्या दिल्या गेल्याचं पवारांच्या निदर्शनास यावेळी आणलं गेलं. त्यावर पवारांनी प्रतिक्रिया दिली.

‘या मेळाव्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली गेल्याचं माझ्या कानावर आलंय. इथले काही लोक आणि आमदार हे करत असल्याचं समजलंय. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. लोकशाहीत नेत्याची एखादी गोष्ट चुकली तर टीका करायची नाही? जाहीर बोलायचं नाही? आणि तसं बोललं तर दमदाटी? ती आमदारानं करावी,’ यावर पवारांनी आश्चर्य त्यांनी व्यक्त केलं.

‘मला इथल्या आमदाराला सांगायचं आहे की तू आमदार कोणामुळं झाला? तुझ्या सभेला इथं कोण आलं होतं? त्यावेळचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता? फॉर्म भरताना नेत्याची सही लागते, ती सही माझी आहे. आणि आज तुम्ही त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना, ज्यांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी घाम गाळला, त्यांना दमदाटी करता? माझी विनंती आहे एकदा झालं ते बस्स झालं! पुन्हा असं केलं तर शरद पवार म्हणतात मला,’ असं पवारांनी ठणकावलं. 'मी अशा रस्त्यानं कधी जात नाही, पण तशी परिस्थिती कुणी निर्माण केली तर सोडतही नाही,' असा इशाराच पवारांनी दिला.

गांधीजींचं नाव घेतात आणि नेहरूंना शिव्या घालतात!

‘आज देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते गांधीजींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरू यांना शिव्या घालतात. हा देश स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी कष्ट केलं, आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुरुंगात घालवला. जसं गांधीजींचं व सुभाषबाबूंचं देशाच्या स्वातंत्र्यात होतं, तसं जवाहरलाल नेहरूंचंही होतं. देशाच्या इतिहासानं त्याची नोंद घेतली आहे. असं असताना आपले पंतप्रधान रोजच्या रोज नेहरूंवर टीका करत असतात,’ अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. ‘देशातील जनतेच्या पैशानं मोदींची जाहिरातबाजी सुरू आहे आणि हे लोकांना गॅरंटी द्यायला निघाले आहेत,’ असा टोला पवारांनी मोदींना हाणला.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या