मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Udayanraje Bhosle Assest : घोडा-गाडी, जमीन जुमला अन् राजवाडा; साताऱ्याच्या उदयनराजेंची संपत्ती किती?

Udayanraje Bhosle Assest : घोडा-गाडी, जमीन जुमला अन् राजवाडा; साताऱ्याच्या उदयनराजेंची संपत्ती किती?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 18, 2024 09:19 PM IST

Udayanraje Bhosale Assest : उदयनराजे छत्रपती यांनी आज सातारा लोकसभा मतदारसंघातून नामांकन दाखल केले. नामांकन दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उदयनराजेंनी आपली संपत्ती घोषित केली आहे.

उदयनराजेंची संपत्ती किती?
उदयनराजेंची संपत्ती किती?

satara loksabha constituency : राज्यातील तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या अनेक मतदारसंघातीलउमेदवारांकडून गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले. उमदेवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांच्या संपत्तीचे विवरण भरावे लागते. यावेळी सातारा गाडीचे महाराज उदयनराजेंनी (udayanraje Bhosle) आपल्या संपत्तीचा प्रतिज्ञापत्रातून खुलासा केला आहे. .

ट्रेंडिंग न्यूज

२००९ च्या लोकसभेनंतर यंदा लोकसभा निवडणुकीत छत्रपती घराण्यांतील दोन उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापुरातून शाहू महाराज तर दुसरे सातऱ्यातून उदयनराजे लढत आहेत. शाहू महाराजांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. आज उदयनाराजेंनीही आपली संपत्ती घोषित करून टाकली आहे.

उदयनराजे छत्रपती यांनी आज सातारा लोकसभा मतदारसंघातून नामांकन दाखल केले. नामांकन दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उदयनराजेंनी आपली संपत्ती घोषित केली आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी २९६ कोटी रुपये संपत्ती जाहीर केली होती. उदयनराजेंनीही तेवढीच संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.

उदयनराजे आणि भोसले कुटुंबीयांची एकूण संपत्ती ही २ अब्ज ९६ कोटी ३९ लाख ११ हजार ५८५ रुपये एवढी आहे.यामध्ये उदयनराजेंच्या पत्नी व मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे. दरम्यान, उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते.

उदयनराजे भोसले यांचे प्रतिज्ञापत्र -

उदयनराजे यांच एकूण गुंतवणीच्या ठेवी - एकूण - १६ कोटी ८८ लाख ७७ हजार ४८ रुपये

उदयनराजे यांच्या पत्नीच्या एकूण ठेवी - १ कोटी २९ लाख ९७ हजर ६१ रुपये

उदयनराजे सोने, चांदी इतर ज्लेवरी – २ कोटी ६० लाख ७४ हजार ३८८

पत्नी दमयंती यांच्याकडे ज्वेलरी - ३५ लाख ६४ हजार ७४० रुपय

तसेच उदयनराजेंच्या मालकीची जिप्सी, २ मर्सिडीज, ऑडी-डी, फॉर्चुरल, स्कॉर्पिओ, टॅक्टर अशी वाहनं आहेत.

उदयनराजे स्थावर मालमत्ता - १ अब्ज ७२ कोटी, ९४ लाख ४९ हजार ६९१ रुपये

पत्नी दमयंती यांची स्थावर मालमत्ता - ३ कोटी ७९ लाख ५७० रुपये.

 

उदयनराजेंवर कर्ज -

उदयनराजे - २ कोटी ४४ लाख ६३ हजार ८४२

WhatsApp channel