sanjay raut news : भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारे नरेंद्र मोदी हे गुजरातचे जॉनी लीवर; संजय राऊत यांची खोचक टीका-sanjay raut compares pm narendra modi to comedian johnny lever ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  sanjay raut news : भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारे नरेंद्र मोदी हे गुजरातचे जॉनी लीवर; संजय राऊत यांची खोचक टीका

sanjay raut news : भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारे नरेंद्र मोदी हे गुजरातचे जॉनी लीवर; संजय राऊत यांची खोचक टीका

Apr 01, 2024 03:49 PM IST

Sanjay Raut comment on Narendra Modi : भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणं हा सर्वात मोठा जोक आहे,' अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारे नरेंद्र मोदी हे गुजरातचे जॉनी लीवर; संजय राऊत यांची खोचक टीका
भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारे नरेंद्र मोदी हे गुजरातचे जॉनी लीवर; संजय राऊत यांची खोचक टीका

Sanjay Raut Comment on Narendra Modi : उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सभेत भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ‘भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलून मोदी हे जाहीर सभांमधून जोक करत आहेत. ते गुजरातचे जॉनी लिवर आहेत,’ अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 'भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हा सर्वात मोठा जोक आहे. जॉनी लीवरनंतर (Johnny lever) आता गुजरातचा लीवर आमचं मनोरंजन करतोय. भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही असं मोदी म्हणतात आणि ते हे बोलत असताना पाच-दहा भ्रष्टाचारी त्यांच्या आजूबाजूला बसलेले असतात. दररोज सरासरी पाच भ्रष्टाचारी भाजपमध्ये प्रवेश करतात. तेही छोटे-मोठे नाही, नामचीन भ्रष्टाचारी असतात. हे सगळे मोदींबरोबर फिरतात. त्यांची गुन्हेगारी प्रकरणं बंद केली जातात.

इलेक्टोरल बाँडवर अद्याप नरेंद्र मोदींनी एक शब्द उच्चारलेला नाही. कुठला भ्रष्टाचार संपवण्याच्या बाता मारता? तुमच्यात हिंमत असेल तर इलेक्टोरल बाँडवर बोला. जगाला मूर्ख बनवण्याचे हे धंदे बंद करा,' असं राऊत यांनी ठणकावलं.

मोदी हे आता काळजीवाहू पंतप्रधान

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होते, आता नाहीत. निवडणुकीची घोषणा झाली की मुख्यमंत्री व पंतप्रधान काळजीवाहू असतात. त्यांना सरकारी यंत्रणा वापरून प्रचार करता येत नाही. पण तसं केलं तर निवडणूक आयोगानं त्या पैशाचं बिल त्यांना पाठवलं पाहिजे आणि त्या पक्षाकडून ते वसूल केलं पाहिजे. नरेंद्र मोदी हे गेल्या काही दिवसांपासून सरकारी विमानं, यंत्रणा वापरून देशभर फिरतायत. त्यांचा एकेक दौरा किमान २५ कोटींचा असतो. आचारसंहिता फक्त विरोधकांसाठी आहे का? मोदी सरकारी यंत्रणा घेऊन प्रचार करतात हा भ्रष्टाचार नाही का?,' असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मोदी मुंबईला कशासाठी येतायत?

मुंबईला ते कशासाठी येतायत? कोणती जमीन शोधण्यासाठी येतायत? अदानीला कोणती जमीन द्यायची, कोणती शिल्लक आहे का हे पाहायला येत आहेत का? गेल्या काही वर्षांत मोदी आणि शहा यांनी अदानी या त्यांच्या मित्राला मुंबई विकली. धारावी विकली. मुंबईतील अनेक भूखंड विकले. उद्योग पळवले. आता ते दहा सभा घेऊन काय करणार? आणखी त्यांना काय विकायचं आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला.