Sangli Lok Sabha Result 2024 : सांगलीची ‘पाटीलकी’ कुणाकडे? तीन पाटलांत ‘विशाल’ आघाडीवर
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Sangli Lok Sabha Result 2024 : सांगलीची ‘पाटीलकी’ कुणाकडे? तीन पाटलांत ‘विशाल’ आघाडीवर

Sangli Lok Sabha Result 2024 : सांगलीची ‘पाटीलकी’ कुणाकडे? तीन पाटलांत ‘विशाल’ आघाडीवर

Published Jun 04, 2024 12:30 PM IST

Sangli Lok sabha Election Result : सांगली मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत. तर भाजपचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत. सांगलीचा निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे.

सांगतील तीन पाटलांमध्ये खासदारकीची चुरस
सांगतील तीन पाटलांमध्ये खासदारकीची चुरस

Sangli Lok Sabha 2024: महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीच्या जागेचा तिढा शेवटपर्यंत सुटला नव्हता. काँग्रेस व महाआघाडीच्या नेत्यांनी विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न केले मात्र ते निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. त्यामुळे सांगलीचा निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. काँग्रेसकडून तिकीट नाकारलेले विशाल पाटील (vishal patil ) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व आता त्यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतली आहे.  (Sangli lok sabha election results 2024)  

पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर अपक्ष उमेदवार विशाल पाटील ७ हजार मतांनी आघाडीवर होते तर  भाजपचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील( chandrahar patil) पिछाडीवर आहेत. 

एक्झिट पोलने महाराष्ट्रात एका जागेवर अपक्ष निवडून येणार असल्याचे म्हटले होते. ही जागा सांगलीची आहे. सांगलीतून विशाल पाटील विजयी होतील अंदाज वर्तवला आहे. 

लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीमध्ये सांगलीमधील जागेवरुन वाद निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांनी मिरजेतील सभेत चंद्रहार पाटील यांच्या नावाची परस्पर घोषणा केल्याने काँग्रेसकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान महायुतीने संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. वंचित आघाडीने विशाल पाटील यांना समर्थन जाहीर केले होते. 

बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का –

बीडमधील हायहोल्टेज लढतीत सर्वांचे लक्ष आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) हे ८ हजार ९६५ मतांनी आघाडीवर आहे. तर, भाजप उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) पिछाडीवर पडताना दिसत आहेत. 

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बजरंग सोनावणे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्यात लढत सुरू आहे. नुकतेच हाती आलेल्या आकड्यानुसार, अशोक हिंगे लढतीत मागे पडल्याचे दिसत असून पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या