VIDEO : राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ, कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडले, दोन्ही नेते भाषण न देताच माघारी
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  VIDEO : राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ, कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडले, दोन्ही नेते भाषण न देताच माघारी

VIDEO : राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ, कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडले, दोन्ही नेते भाषण न देताच माघारी

Updated May 19, 2024 05:37 PM IST

Rahul Gandhi Sabha : प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गोंधळ झाला. अनियंत्रित झालेला जजमाव बॅरिकेडिंग तोडून स्टेजजवळ पोहोचला. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ
राहुल गांधी व अखिलेश यांच्या सभेत गोंधळ

यूपीमधील फूलपूर आणि प्रयागराज येथे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) व राहुल गांधी यांची संयुक्त रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्ते बैरिकेडिंग तोडून स्टेजच्या जवळ पोहोचले. त्यानंतर फूलपूरमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अखिलेश स्टेजवर उपस्थित नेत्यांना भेटून निघून गेले. दोन्ही नेत्यांनी सभेला संबोधितही केले नाही.

फूलपूरनंतर प्रयागराज येथे इंडिया आघाडीची संयुक्त रॅली झाली. येथे राहुल गांधी आधीपासूनच स्टेजवरच उपस्थित होते. थोड्या वेळात अखिलेश यादवही व्यासपीठावर दाखल झाले. त्यानंतर मैदानावर उपस्थित कार्यकर्ते पुढे येऊ लागले. मोठा गोंधळ होऊ लागल्यानंतर मंचावरून सांगण्यात आले की, कार्यकर्त्यांनीसंयम राखावा, बॅरिकेड तोडू नये, सभा व्यवस्थित पार पाडू द्या, मात्र कार्यकर्ते अनियंत्रित झाले व त्यांनी बॅरिकेडिंग तोडून स्टेजजवळ पोहोचले.

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गोंधळ झाला. अनियंत्रित झालेला जजमाव बॅरिकेडिंग तोडून स्टेजजवळ पोहोचला. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. घटनेचे गांभीर्य पाहून राहुल-अखिलेश भाषण न देताच परतले. रॅलीचे आयोजन फूलपूर लोकसभा मतदारसंघात केले गेले होते. राहुल आणि अखिलेश आल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठी गर्दी झाली. राहुल गांधी आणि अखिलेश यादव हेलीकॉप्टरने आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी जमाव अनियंत्रित झाला.

त्यानंतर अखिलेश यादव यांनी मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, आम्ही आमचे विचार तुमच्यासमोर ठेवण्यासाठी आलो आहे. मला माहिती आहे, तुमचा उत्साह वाढला हे. हाच जोश आपल्याला मतदानाच्या तारखेपर्यंत कायम ठेवायचा आहे. येथे येण्यापूर्वी आम्ही फूलपुर येथे होते. येथे दिसणारा जोश आणि उत्साह फूलपूरमध्येही होता. हे दृष्य पहिल्यांदा दिसत नाही. मी जेव्हा मागच्या निवडणुकीसाठी येथे आलो होतो, तेव्हा आपले विचारही मांडू शकलो नव्हतो. त्यानंतरही तुम्ही समाजवादी पार्टीला मतदान दिले होते.

अखिलेश यांनी म्हटले की, भाजप तुमचा व माझा जीव तसेच संविधानाच्या मागे लागली आहे. जर संविधान राहिले तरच नोकऱ्या मिळतील, गोरगरीब जनतेचा सन्मान कायम राहील. अखिलेश यांनी पेपर लीकवर भाष्य करताना भाजपवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर म्हटले की, जर इंडिया आघाडी सत्तेत आली तर अग्निवीर योजना रद्द केली जाईल.

अखिलेश यांच्या भाषणानंतर राहुल गांधी यांनी जनसभेला संबोधित केला. यावेळी त्यांनी म्हटले की, मोदींनी देशातील २२ लोकांनी अब्जाधीश बनवले आहे. मात्र आम्ही कोट्यवधी लोकांना लखपती बनवणार आहोत. देशातील कोट्यवधी गरीबांची यादी तयार केली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेची निवड केली जाईल. त्यानंतर अशा कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात वर्षाला १ लाख रुपये म्हणजेच महिन्याला ८५०० रुपये जमा केले जातील. तसेच आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू.

Whats_app_banner

संबंधित बातम्या