Lok Sabha Election 2024: पुलवामा हल्ला हा पूर्वनियोजित कट; प्रणिती शिंदेंचा आरोप; भाजपची तक्रार
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election 2024: पुलवामा हल्ला हा पूर्वनियोजित कट; प्रणिती शिंदेंचा आरोप; भाजपची तक्रार

Lok Sabha Election 2024: पुलवामा हल्ला हा पूर्वनियोजित कट; प्रणिती शिंदेंचा आरोप; भाजपची तक्रार

Apr 28, 2024 12:45 PM IST

Praniti Shinde On Pulwama Attack: प्रणिती शिंदे यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचे बोलत मोदी सरकारकडे बोट दाखवले.

लोकसभा निवडणूक २०२४: काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
लोकसभा निवडणूक २०२४: काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

BJP files complaint to ECI Against Praniti Shinde: जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत (Pulwama attack) चांगलीच चर्चा रंगली आहे. या हल्ल्यावरून आजही विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)d आणि केंद्र सरकारवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. पुलवामा हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचे बोलत त्यांनी मोदी सरकारकडे बोट दाखवले आहे. मात्र, प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याने भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांनी प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचार गीतातून 'जय भवानी' शब्द काढावाच लागणार! निवडणूक आयोगाने काय म्हटले?

भाजपने काय म्हटले?

प्रणिती शिंदे यांनी एका जाहीर सभेत पुलवामा हल्लाचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत.पुलवामा दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचे त्यांनी म्हटले. यासंदर्भातील दावे सरकारमधील अधिकाऱ्यांनी केल्याचा संदर्भ त्यांनी दिला. प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. त्यांचे हे वक्तव्य देशाची बदनामी करणारे आहे, असे भाजपने म्हटले आहे.

Parbhani boycott Election: परभणीच्या बलसा खुर्द येथील गावकऱ्यांचा मतदानावर घातला बहिष्कार; समोर आले 'हे' कारण

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या होत्या?

प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाल्या, "जेव्हा त्यांना कळत की आपली बाजू झुकत आहे, त्यावेळी ते जातीमध्ये तेढ निर्माण करतात. सावध राहा. मागच्यावेळेसही पुलवामा हल्ला घडवून आणला. त्यांचे अधिकारीच म्हणाले की पुलवामा दहशतवादी हल्ला घडला नाहीतर घडवून आणला आहे. पण कसे घडवले, आपल्या जवानांच्या रक्तातून...वा...विरोधक एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतात. यातूनच त्यांची मानसिकता कळते."

सोलापुरात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात प्रतिष्ठेची लढाई

सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, भाजपने माळशिरसचे विद्ममान आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवले आहे. सोलापूरची जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे

Whats_app_banner

संबंधित बातम्या