sonia gandhi video message : सोनिया गांधी यांचा व्हिडिओ संदेश; पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काय बोलल्या पाहा!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  sonia gandhi video message : सोनिया गांधी यांचा व्हिडिओ संदेश; पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काय बोलल्या पाहा!

sonia gandhi video message : सोनिया गांधी यांचा व्हिडिओ संदेश; पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काय बोलल्या पाहा!

Updated May 07, 2024 06:57 PM IST

Sonia Gandhi Video Message : संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी इंडिया आघाडी कटिबद्ध आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज पुन्हा एकदा तुमच्या पाठबळाची गरज आहे, असं आवाहन सोनिया गांधी यांनी मतदारांना केलं आहे.

सोनिया गांधी यांचा व्हिडिओ संदेश; पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काय बोलल्या?
सोनिया गांधी यांचा व्हिडिओ संदेश; पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काय बोलल्या?

Sonia Gandhi Video Message : ‘देशाच्या कानाकोपऱ्यात आज महिलांवर अत्याचार सुरू आहेत. बेरोजगारी वाढली आहे. दलित, आदिवासी, मागासवर्गीय व अल्पसंख्याकांना भयंकर भेदभावाचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कुटील हेतूमुळं हे सगळं घडत आहे,’ असा गंभीर आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळं निवडणुकीतून माघार घेतलेल्या व प्रत्यक्ष निवडणूक प्रचारापासून दूर असलेल्या सोनिया गांधी यांनी नुकताच एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे. यातून त्यांनी देशातील मतदारांशी संवाद साधला. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनतेनं काँग्रेसच्या पाठीशी उभं राहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

आज पुन्हा तुमच्या पाठबळाची गरज आहे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर त्यांनी सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष राजकीय फायद्यासाठी द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याउलट काँग्रेस प्रत्येकाच्या प्रगतीसाठी संघर्ष केला आहे. वंचिताना न्याय देण्यासाठी व देशाला मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज पुन्हा एकदा आम्हाला तुमच्या पाठबळाची गरज आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

संविधान रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध

'गरिबांचं उत्थान, युवक आणि महिलांचं सक्षमीकरण, शेतकरी आणि मजुरांना आधार आणि उपेक्षित समाजाला बळकटी देणं हा आमचा उद्देश आहे. आमच्या न्यायपत्रामध्येही याचाच उल्लेख आहे, याची आठवण सोनिया गांधी यांनी दिली.

'काँग्रेस आणि इंडिया आघाडी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. सर्वांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काँग्रेसला मतदान करा. आपण सर्वांनी मिळून मजबूत आणि अखंड भारत घडवूया, असं आवाहन त्यांनी केलं.

उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या सोनिया गांधी यांनी यापुढं निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या राज्यसभेत निवडून गेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या रायबरेलीचं प्रतिनिधित्व करत होत्या. नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही सोनिया गांधी यांनी हा बालेकिल्ला अभेद्य राखला आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे रायबरेली इथून निवडणूक लढवत आहेत.

राहुल गांधी हे देखील आक्रमकपणे प्रचारात उतरले आहेत. मागील महिनाभरापासून त्यांनी देशभर सभांचा धडाका लावला आहे. भाजपच्या विचारसरणीवर ते हल्ले चढवत आहेत. संविधान, सामाजिक न्याय या मुद्द्यांवर त्यांचा भर आहे. प्रियांका गांधी या देखील देशभर प्रचार करत आहेत. सोनिया गांधी मात्र कुठंही दिसल्या नाहीत. आज त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या