पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या उत्तराधिकारीबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोठी टिप्पणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी बिहारमधील महाराजगंज येथील रॅलीला संबोधित करताना म्हटले की, माझा कोणीही उत्तराधिकारी नाही. देशाचे लोकच माझे उत्तराधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सतत म्हणत आहेत की, जर यावेळी भाजपचे सरकार आले तर पंतप्रधान मोदी दोन वर्षातच सर्व सूत्रे अमित शहांकडे सोपवून राजकीय निवृत्ती घेऊ शकतात. यामुळे आता मोदींनी कोणाचेही नाव न घेता या आरोपाला उत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या रॅली संबोधित करताना म्हटले की, बिहार राजेंद्र प्रसाद यांची भूमी आहे, मात्र आरजेडी आणि काँग्रेसने याची ओळख वसूली भूमी करून ठेवली आहे. पंतप्रधान मोदींनी या रॅलीत लोकांना आवाहन केले की, तुम्हा गावा-गावात जावा व लोकांना सांगा की, तुम्ही मोदींकडून आला आहात. त्यांना सांगा की, पुन्हा एनडीएचे सरकार आल्यावर त्यांना कसे पक्के घर मिळेल.
ही घरे महिलेच्या नावावर असतील. आगामी पाच वर्षे बिहारसाठी विकास व समृद्धी घेऊन येतील. माता-भगिनी आता ड्रोन पायलट बनतील व त्या ड्रोनच्या माध्यमातून शेती करून पायलट बनतील. आम्ही अशी योजना बनवली आहे. आमची गारंटी आहे की, तीन कोटी भगिनींना लखपती दीदी बनवणार आहोत.
पंतप्रधान मोदींनी या रॅलीत लोकांना स्पष्ट सांगितले की, त्यांनी उमेदवार कोण आहे हे पाहू नये केवळ पंतप्रधानांची निवड करावी. त्यांनी म्हटले की, तुमचे मत खासदार निवडण्यासाठी नव्हे तर देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आहे. तुम्ही लोकांनी सर्वांना सांगायचे आहे की, मोदीजी आले होते व त्यांनी तुम्हाला जय श्रीराम म्हटले आहे.
INDIA आघाडीवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदींनी म्हटले की, हे लोक सहन करू शकत नाहीत की, देशाची जनता पुढच्या पाच वर्षासाठी भाजपला पुन्हा निवडत आहे. जसे जसे ४ तारीख जवळ येत आहे, या लोकांकडून मला दिल्या जाणाऱ्या शिव्याही वाढल्या आहेत. पीएम मोदींनी म्हटले की, आपल्या मुलांचे भविष्य, विकसित बिहार आणि विकसित भारतासाठी हे सरकार आवश्यक आहे.
संबंधित बातम्या