PM Modi Nomination: मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा भरला उमेदवारी अर्ज, जाणून घ्या पंतप्रधानांचे शिक्षण व संपत्ती ?
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Modi Nomination: मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा भरला उमेदवारी अर्ज, जाणून घ्या पंतप्रधानांचे शिक्षण व संपत्ती ?

PM Modi Nomination: मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा भरला उमेदवारी अर्ज, जाणून घ्या पंतप्रधानांचे शिक्षण व संपत्ती ?

May 14, 2024 07:04 PM IST

PM Narendra Modi Nomination : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत सोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचे आकडे जारी केले आहेत. यानुसार यांच्याकडे स्वत:चे घर नाही. तसेच त्यांच्याकडे कोणतीही गाडी नाही.

मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा भरला उमेदवारी अर्ज
मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा भरला उमेदवारी अर्ज

PM Narendra Modi Nomination from varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचे संपूर्ण विवरण देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींकडे सध्या ३ कोटींहून अधिकची संपत्ती आहे.

मोदींकडे स्वत:चे घर किंवा गाडी गाडी नाही -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वत:चे घर नाही. तसेच त्यांच्याकडे कोणतीही गाडी नाही. मोदींकडे एकूण ५२,९२० रुपयांची रोकड आहे.त्याचबरोबर स्टेट बँकच्या गांधीनगर शाखेत ७३,३०४ तरएसबीआयच्या वाराणसी शाखेत केवळ केवळ ७ हजार रुपये आहेत. पीएम मोदींकडे २,८५,६०,३३८कोटी रुपयांचीस्टेट बँकेत एफडीही आहे.

मागील पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे इनकम -
पीएम मोदींनी आपल्या मागील पाच वर्षातील संपत्तीचे विवरण दिले आहे. २०१८-१९ मध्ये त्यांची संपत्ती ११,१४,२३०,  २०१९-२० मध्ये १७,२०,७६०, २०२०-२१ मध्ये १७,०७,९३०, २०२१-२२ मध्ये १५,४१,८७० तर २०२२-२३ मध्ये पंतप्रधानांकडे २३,५६,०८० रुपयांचे इनकम आहे.

पीएम मोदीची शैक्षणिक पात्रता -
मोदींच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९६७ मध्ये गुजरात बोर्डातून एसएससी केले होते. १९७८ मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली होती. तर १९८३ मध्ये गुजरात युनिवर्सिटीतून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्सची डिग्री घेतली होती.

मोदींकडे सोन्याच्या चार अंगठ्या -
पंतप्रधान मोदींकडे सोन्याच्या चार अंगठ्याही आहेत. ज्या त्यांनी कित्येक वर्षापासून सांभाळून ठेवल्या आहेत. याची किंमत २,६७,७५० रुपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्नीचे नाव जशोदाबेन असे लिहिले आहे. मनॅशनल सेविंग स्कीममध्ये पीएम मोदींकडे ९,१२,३९८ रुपये आहे. पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती ३,०२,०६,८८९ रुपये आहे.

कोण आहेतपीएम मोदींचे चारप्रस्तावक?

काशीतील ज्योतिष परंपरेने येणाऱ्या ब्राह्मण समाजातून गनेश्वर शास्त्री द्रविड, जनसंघापासून भाजपशी जोडलेले बैजनाथ पटेल, ओबीसी समाजातील लालचंद कुशवाहा आणि दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारे संजय सोनकर यांना पीएम यांचे प्रस्तावक बनवले गेले. पंडित गणेश्वर शास्त्री यांनी अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचा शुभ मुहूर्त काढला होता. ते ब्राह्मण समाजातील आहे.

Whats_app_banner