PM Narendra Modi : “जे निवडणूक जिंकू शकत नाहीत, त्यांनी..” पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींवर निशाणा
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Narendra Modi : “जे निवडणूक जिंकू शकत नाहीत, त्यांनी..” पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींवर निशाणा

PM Narendra Modi : “जे निवडणूक जिंकू शकत नाहीत, त्यांनी..” पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींवर निशाणा

Apr 21, 2024 09:02 PM IST

Pm Narendra Modi on Sonia Gandhi : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी (Pm Modi) म्हणाले की, जे लोक निवडणूक लढू शकत नाहीत, जिंकू शकत नाहीत, ते राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत पोहोचतात.

पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींवर निशाणा
पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींवर निशाणा

Pm Narendra Modi on Sonia Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) रविवारी राजस्थानमध्ये अनेक प्रचार सभांना संबोधित केले. मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) राज्यसभा नियुक्तीवर निशाणा साधला. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले की, जे लोक निवडणूक जिंकू शकत नाहीत ते राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत पोहोचतात. राजस्थानमधील जालौर येथील एका प्रचार सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, काँग्रेसने सर्वात आधी दक्षिणेतील एक नेता (केसी वेणुगोपाल) यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवले. त्यानंतर मनमोहन सिंह यांना राज्यसभेत पाठवले आता पुन्हा एक नेता (सोनिया गांधी) यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जे लोक निवडणूक लढू शकत नाहीत, जिंकू शकत नाहीत, ते राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत पोहोचतात. मोदींनी म्हटले की, कधीकाळी ४०० जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आज ३०० उमेदवारही मिळत नाहीत. काँग्रेस आपल्या करणीची फळे भोगत आहे. विरोधकांची आघाडी इंडियावर टीका करताना मोदी म्हणाले की, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत २५ टक्के जागा अशा आहेत, जेथे इंडिया आघाडीतील घटक पक्षच एकमेकांमध्ये लढत आहेत.

मोदी म्हणाले काँग्रेसने घराणेशाही व भ्रष्टाचाराची वाळवी पसरवून देश पोखरला आहे. राजस्थानमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाकडे लक्ष वेधताना मोदींनी म्हटले की, पहिल्या टप्प्यातील मतदानात अर्ध्या राजस्थानने काँग्रेसला बरोबर धडा शिकवला आहे. राष्ट्रभक्त राजस्थानला माहिती आहे की, काँग्रेस कधीही मजबूत भारत बनवू शकत नाही. असे काँग्रेस सरकार नको जे देशाला २०१४ पूर्वीच्या स्थितीत आणेल. आधीची सरकार रिमोट कंट्रोलने चालत होती. पंतप्रधानांना कोणीही विचारत नव्हता.

यापूर्वी शनिवारी मोदींनी महाराष्ट्रात एका रॅलीला संबोधित करताना म्हटले की, २०१९ मध्ये अमेठीतून निवडणूक हरल्यानंतर राहुल गांधी वायनाडला गेले. यावेळी त्यांना वायनाडमधूनही पळून जावे लागेल. काँग्रेसचे शहजादे २६ एप्रिलच्या मतदानाची वाट पाहत आहे. त्यानंतरते व त्यांची गँग एका सुरक्षित जागेचा शोध घेतील.

राजस्थानमधून राज्यसभेत पोहोचलेल्या सोनिया गांधी यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा सीट सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान काँग्रेसने अजूनपर्यंत या जागेवर आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

Whats_app_banner