मराठी बातम्या  /  elections  /  Pawan Singh : भाजपाला धक्का; भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांचा आसनसोलमधून निवडणूक लढण्यास नकार

Pawan Singh : भाजपाला धक्का; भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांचा आसनसोलमधून निवडणूक लढण्यास नकार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2024 06:18 PM IST

Bjp Candidate List 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून त्यानुसार पश्चिम बंगालमधील आसनसोल (Asansol) लोकसभेसाठी भोजपुरी अभिनेते आणि गायक पवन सिंह (Pawan Singh) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपण निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले

भोजपुरी गायक व अभिनेते पवन सिंह यांचा लोकसभा लढण्यास नकार
भोजपुरी गायक व अभिनेते पवन सिंह यांचा लोकसभा लढण्यास नकार

BJP candidate List 2024 : भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह याने आज लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपने कालच त्याला पहिल्या उमेदवारी यादीत पश्चिम बंगालमधील  आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पवन सिंहने एक्स वर पोस्ट करत म्हटले की, मी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेऊन मला पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. मात्र काही कारणामुळे मी ही निवडणूक लढवू शकणार नाही.

भाजपने शनिवारी (२ मार्च) १६ राज्यातील १९५ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये भोजपुरी अभिनेते आणि गायक पवन सिंह याला आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी भाजपाला धक्का बसला आहे. कारण पवन सिंह याने निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले. 

लोकसभा लढण्यास पवन सिंह यांनी नकार दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. बंगालमधील लोकांच्या ताकदीमुळेच पवन सिंह यांना माघार घ्यावी लागली, असा टोला बॅनर्जी यांनी लगावला आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते साकेत गोखले यांनीही भाजपावर टीका करताना म्हटले की, पश्चिम बंगालमधील ४२ मतदारसंघापैकी एका जागेवर भाजपाने निवडणूक जाहीर होण्याआधीच माघार घेतली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांना भाजपने तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशमधील मथुरा मतदारसंघातून तिकीट दिली आहे. अभिनेता पवन सिंहला पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिलं होतं. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे सध्या आसनसोलचे खासदार आहेत.

WhatsApp channel