प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो यांचा १९८२ साली प्रदर्शित झालेला 'गांधी' हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत महात्मा गांधींबद्दल जगाला माहिती नव्हती, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ‘एबीपी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या विेशेष मुलाखतीत मोदी यांनी वरील मत व्यक्त केलं. ते म्हणाले, 'महात्मा गांधी हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. पण जगाला त्यांची माहिती नव्हती. मला माफ करा, पण जगात पहिल्यांदा त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं ते 'गांधी' हा चित्रपट बनवताना. आम्ही तसे केले नाही,' असा दावा पंतप्रधानांनी मुलाखतीदरम्यान केला आहे. गेल्या ७५ वर्षांत गांधींना जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणे ही देशाची जबाबदारी नाही का, असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दाव्यावरून काँग्रेस पक्षाने टीका केली आहे. 'महात्मा गांधी हे जगातील महान आत्मा होते. या ७५ वर्षांत महात्मा गांधींविषयी जगाला माहिती देणे ही आपली जबाबदारी नव्हती का?
मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांना जग ओळखत असेल तर गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते आणि ते तुम्हाला स्वीकारावे लागेल. जग फिरल्यानंतर मी हे सांगत आहे..." असा दावा मोदींनी या मुलाखतीत केला आहे.
या टीव्ही मुलाखतीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच काँग्रेसने पंतप्रधानांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींचा वारसा नष्ट करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. ‘मावळते पंतप्रधान अशा जगात राहतात जिथे १९८२ पूर्वी महात्मा गांधींना जगभरात मान्यता नव्हती, असे दिसते.’ अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केली. ‘महात्मा गांधींचा वारसा जर कोणी नष्ट केला असेल तर ते स्वत: मावळते पंतप्रधान यांनी केला आहे. वाराणसी, दिल्ली आणि अहमदाबादमधील गांधीवादी संस्था त्यांच्याच सरकारने उद्ध्वस्त केल्या आहेत.’ असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याला महात्मा गांधींचा राष्ट्रवाद समजत नाही, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या विचारधारेमुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळेच नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली होती.
२०२४ ची लोकसभा निवडणूक ही महात्मा भक्त आणि गोडसे भक्त यांच्यातली लढाई आहे. मावळते पंतप्रधान आणि त्यांच्या गोडसेभक्त सहकाऱ्यांचा पराभव निश्चित आहे, असेही जयराम रमेश यांनी लिहिले आहे.
संबंधित बातम्या