Hindustan Times
-मोदीजींना पूर्वीपेक्षाही चांगला, उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो आहे. लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. आमच्या सभांमधली गर्दी ही जमा केलेली नसते.
-मतदारांमध्ये गडबडगोंधळ, गोंगाट कमी दिसतोय. त्याचं कारण म्हणजे मोदीजींनी तयार केलेला निष्ठावंत असा मतदार वर्ग. २०१४ मध्ये मतदारांना एक आशा दिसली. २०१९ मध्ये त्यांनी आश्वासनांची झालेली पूर्तता पाहिली. २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यास मतदारांना सरकारच्या कामगिरीबाबत विश्वास आहे. मतदार आता स्थिरावलेत. त्यांना पूर्वीप्रमाणे आक्रमकपणे मते मांडण्याची गरज राहिली नाही.
मतदान कमी झाले असून आणि लोक नाराज आहेत, अशी खोटी माहिती पसरवली जात आहे. २०१९ च्या तुलनेत २४ पैकी केवळ ४ मतदारसंघात कमी मतदान झाले आहे. आकडेवारीत फार लक्षणीय अशी घट झालेली नाही.
-मोदींबद्दल बोलायचे झाल्यास राज्यात सत्ताविरोधी लहर (anti-incumbency) नाही. काही वैयक्तिक उमेदवारांबद्दल हे असू शकते. जनतेला मोदी पुन्हा पंतप्रधान हवे आहे. उमेदवारांना नाही तर पंतप्रधान मोदींना ते मतदान करतील, असं मतदारांनी सांगितलं आहे.
-मोदींनी राज्यात आतापर्यंत १२ सभा घेतल्या आहेत. आमच्या मित्रपक्षांना (शिवसेना, एनसीपी) एकेकाळी अविभाजित पक्षांची शंभर टक्के मते मिळत नसल्याने मोदी त्यांच्यासाठीही सभा घेत आहेत. जिथे आम्हाला सीट निवडून येण्याबद्दल साशंकता आहे तिथे मोदींच्या सभा आयोजित केल्या जात आहेत.
-मित्रपक्ष एकमेकांचे उमेदवार ठरवू शकत नाहीत. आम्ही त्यांना फारतर सूचना करू शकतो. पण शेवटी तो प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. त्यांनी उभे केलेले उमेदवार योग्य आहेत की नाही हे निकालानंतरच कळेल. आमच्या दोन्ही मित्रपक्षांना (शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार) लोकसभेच्या जास्त जागा हव्या होत्या. २०१९मध्ये शिवसेनेने २३ जागा लढल्या होत्या. त्यामुळे शिंदे यांना २३ जागा लढवायच्या होत्या. अजितदादांना १० जागा हव्या होत्या, पण पाच जागांवर समाधान मानावे लागले. आम्हालाही तीसपेक्षा जास्त जागा हव्या होत्या. पण तीन पक्षांच्या आघाडीत एकमेकांना सामावून घ्यावे लागते. हे आमच्या मित्रपक्षांना ठावूक आहे.
-मला तसं वाटत नाही. पूर्वीची शिवसेना किवा पवार समर्थक नाराज असतीलही, परंतु जनता नाराज नाही. हा वाद आम्ही सुरू केला नसून उद्धव ठाकरे यांनीच सुरू केला होता, हे सर्वसामान्यांना माहित आहे. पक्षफुटीसाठी संबंधित पक्षप्रमुखच जबाबदार आहेत.
-उद्धव ठाकरे यांना पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री व्हायचे होते. आमदारांदरम्यान शिंदेंच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ते असुरक्षित झाले होते. त्यांनी शिंदेंचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांना बंड करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. अजित पवार यांनाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेकदा शरद पवारांनी त्यांना चर्चेसाठी आमच्याकडे पाठवले आणि त्यानंतर भूमिका बदलली होती. सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी अजितदादांना खलनायक सदृष्य दाखवण्यात आले. कारण शरद पवारांना पक्षाची सूत्रे सुप्रियांकडे सोपवायची होती. दोन्ही पक्ष फोडण्यात आमचा हात नव्हता. एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही त्याचा साहजिकच फायदा घेतला.
एका अनौपचारिक कार्यक्रमात मी ती उपहासात्मक टिप्पणी केली होती. मोदीजींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मरणासन्न काँग्रेससोबत राहण्याऐवजी एनडीएत येण्याचे जाहीर आवाहन केले होते. विरोधकांना मात्र ते एनडीएत येण्याचे आमंत्रण वाटले.
-ओबीसी आणि मराठा दोघेही आमच्यासोबत आहेत. ज्यांचे राजकारण जातीयवादावर आधारित आहे, अशा लोकांकडून फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. काही मतदारसंघांत फूट आहे, पण संपूर्ण राज्यात फूट नाही. राज्याच्या राजकारणातील हा एक वाईट ट्रेंड आहे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेसाठी ते वाईट आहे.
-जरांगे-पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षाचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. आता हे खरे आहे की नाही हे निवडणुकीनंतरच कळेल.
-कोणतेही सरकार राज्यघटना बदलू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाचा हा निकाल आहे. ही गोष्ट पहिल्यांदाच प्रचारात सांगितली जात नाहीए. २०१४ आणि २०१९ मध्येही विरोधकांनी हा प्रचार केला होता. त्याचा फार फायदा होईल असं वाटत नाही.
मोदी मुस्लिमांना टार्गेट करत नाहीत. ते फक्त आपल्या समाजाची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांचा पर्दाफाश करत आहेत. आम्हाला मुस्लीम उमेदवारांबद्दल विचारले जाते. पण काँग्रेसने महाराष्ट्रासह दहा मोठ्या राज्यांमध्ये एकही मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही. त्यांना अल्पसंख्याकांची मते हवी आहेत. पण त्यांना प्रतिनिधित्व द्यायचे नसते. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये मुस्लिमांचा समावेश आहे. आम्ही त्यांना वगळलेले नाही. केवळ तुष्टीकरणामुळे एखादा समाज मतदान करेल, हा समज आम्हाला मोडून काढायचा आहे.
-मोदींची ८० टक्के भाषणे त्यांनी केलेल्या विकासकामांवर तर २० टक्के भाषणे इतर मुद्द्यांवर असतात. आम्ही या मुद्द्यांवर बोलतो कारण विरोधक ते मुद्दे उठवतात आणि आम्हाला त्यांचा प्रतिकार करावा लागतो. कारण काही लोक त्यावर विश्वास ठेवू शकतात.
जेव्हा आम्ही पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली तेव्हा साहजिकच आमचे पवारांशी मतभेद झाले. त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात आमची पकड झाली. सलग निवडणुकीत आम्ही अनेक जागा जिंकल्या. ही वैयक्तिक लढाई नव्हती. आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा होता आणि आम्ही तो केला.
शक्य आहे. आमच्या आघाडीत होणार नाही. विरोधी आघाडीत होतील.
आता तशी शक्यता वाटत नाही. नितीश कुमार दोनदा एनडीएत आले आणि बाहेर पडले. परंतु त्यांनी कधीही वैयक्तिक हल्ले केले नाहीत. ठाकरे ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत, त्यामुळे ही शक्यता संपुष्टात आली आहे. सामंजस्य करण्यासाठी त्यांनी वाव ठेवला नाही.
आत्ता व्यवस्था आहे तशीच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत काय करायचे याचा निर्णय पक्ष घेईल.
मविआने तयार केलेल्या खोट्या कथानकाचा भांडाफोड झाला आहे. घाटकोपरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला प्रवेश न देणाऱ्या हाऊसिंग सोसायटीत मराठी आणि दक्षिण भारतीय रहिवासीसुद्धा राहतात. हे मानहानीचे प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईत उद्धव ठाकरे विकासाच्या मुद्द्यावर मते मागू शकत नाहीत. २५ वर्षे त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने मुंबईसाठी काहीच केलेले नाही. त्यांचा भ्रष्टाचारही उघडकीस आला आहे. त्यामुळे त्यांना मराठी विरुद्ध गुजराती किंवा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र असे मुद्दे उपस्थित करावे लागत आहे. त्यांच्या कार्यकाळात मुंबईच्या अनेक भागातून मराठी माणूस कसा हद्दपार झाला, हेही आम्ही दाखवणार आहोत.
२०१२ मध्ये (मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी) आयएफसी गुजरातमध्ये गेले होते. मी मुंबईत इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मुंबईसाठी दुसरा आयएफसी मंजूर होईल असे मला सांगण्यात आले.
जागावाटपाच्या वाटाघाटीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आमच्या कार्यकर्ते नाराज होते. पण ते आता सगळीकडे मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी काम करत आहेत. मोदीजींना एकटे पाडण्याचे कसे प्रयत्न केले जात आहेत, हे ते पाहताएत. युतीद्वारे पक्षाची ताकद वाढवून आपल्या जागा वाढवण्याची कशी गरज आहे, हे त्यांना समजेल आहे.