Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा प्रसार वाढल्याचे दिसून येत आहेत. खोट्या बातम्यांच्या आधारे नागरिकांमध्ये संभ्रण निर्माण करणाऱ्या समाजकंटकाविरोधात कठोर कारवाई केली जात असतानाही हा प्रकार थांबायचे नाव घेईना. सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या जाहीरनाम्या संदर्भात एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यात काँग्रेसला हिंदूंची संपत्ती मुस्लीम समाजामध्ये वाटायची असल्याचा दावा करण्यात. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते सरवणन यांनी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोव्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने २२ एप्रिल रोजी एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये काँग्रेसला हिंदूंकडून संपत्ती काढून घ्यायची आहे आणि मुस्लिमांना वाटून घ्यायची आहे. काँग्रेस एससी, एसटीएससह हिंदूंचा द्वेष करते", असे लिहिण्यात आले होते. याप्रकरणी बंगळुरूचे रहिवासी डेंट आणि काँग्रेस कार्यकर्ता सरवणन यांनी सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली.
बीटी सेलचे प्रमुख अमिक मालवीय यांनी एक्सवर पोस्ट केले की, काँग्रेस जाहीरनाम्याबाबत चुकीची माहिती पसवल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली.आम्ही त्याच्या संपर्कात आहोत आणि त्याला कायदेशीर आधार मिळेल याचा प्रयत्न करू. काँग्रेसने अराजक माजवले आहे, देशात दुसरी आणीबाणी कधीच येणार नाही", असे त्यांनी म्हटले आहे.
याप्रकरणावर भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कर्नाटकात काँग्रेस सत्तेचा दुरुपयोग करत आहे. आम्ही न्यायालयाच्या आत आणि बाहेर या दोन्ही गोष्टी लढवू, असे त्यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या