Ajit Pawar : ‘मंत्री होतो काय? आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज-maharashtra politics shirur lok sabha constituency ajit pawar challenges ncp mla ashok pawar ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ajit Pawar : ‘मंत्री होतो काय? आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज

Ajit Pawar : ‘मंत्री होतो काय? आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज

May 10, 2024 12:25 AM IST

Ajit Pawar Challenges Ashok Pawar : अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना थेट आव्हान दिले आहे. “आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो,मंत्री होतो काय?”,अशा खास आपल्या शैलीत अजित पवारांनी आव्हान दिले आहे.

अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज
अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज

Shirur lok sabha constituency : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी मावळ व शिरुर मतदारसंघातील उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील आणखी एका आमदाराला निवडणुकीत पाडण्याचं थेट आव्हान दिलं. शिरुर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत अजित पवारांनी आमदार अशोक पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिरुरचे आमदार अशोक पवार पुन्हा आमदार कसा होतो,तेच पाहतो,असं म्हणत अजित पवारांनी शिरुर तालुक्यातील न्हावरा येथील सभेतून अशोक पवारांना विधानसभा निवडणुकीत पाडण्याचे आव्हान दिलं. काही वर्षापूर्वी त्यांनी भाजपचे उमेदवार विजय शिवतारे यांनाही असंच आव्हान दिलं होतं.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कोल्हेंच्या पराभवासाठी जोरदार मोर्चेबांधणी करणाऱ्या अजित पवारांच्या निशाण्यावर आता शिरुरचे आमदार अशोक पवारही आले आहेत.

प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना थेट आव्हान दिले आहे. “आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो,मंत्री होतो काय?”,अशा खास आपल्या शैलीत अजित पवारांनी आव्हान दिले आहे. त्यांच्या या विधानाची आता मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

शपथविधीवेळीमाझ्याकडे लोक जमली, एफिडेव्हिट केलं. कोल्हेंनी केलं,आमच्या भावकीने केलं म्हणजे अशोक पवारने केले. बाकीच्या सगळ्यांनी केलं आणि शपथविधीला गेलो. पहिला शपथविधी उपमुख्यमंत्री म्हणून माझा झाला. दुसरा सिनियरीटीप्रमाणे भुजबळांचा. तिसरा किंवा चौथा दिलीप वळसे पाटलांचा झाला. वळसे पाटलांचा शपथविधी झाला आणि याची सटकली. हा म्हणाला दादांनी यांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. दादा एकटे जिल्ह्यातून गेले असते तरी आपली कामं झाली असती. आपलं काय जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या हाताला जे आमदार बसले होते त्यांच्या कानात त्यांनी काहीतरी सांगितलं. मला घरी आल्यावर त्या आमदाराने सांगितलं, की अशोक असा म्हणत होता.

त्यानंतर ते शरद पवार गटात गेले. त्यांना पवार साहेबांनी गाजर दाखवलं व सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता याचे कारखान्याची वाट लावली आणि सगळ्याची वाट लावली अन् निघाला मंत्री व्हायला. पण मंत्री होण्यासाठी पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय? अजित पवारांनी एकदा मनावर घेतलं तर मी आमदार होऊ देत नाही. आता मी पण चॅलेंज देतो तुम्ही आमदरच कसा होता ते बघतो. मी लोकांना सांगेन की यांची खरी औकात काय आहे? आम्ही केलेली कामे जनतेसमोर मांडेन, असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांना दिले.

अशोक पवारांचे जशास तसे उत्तर –

दरम्यान अजित पवारांच्या अव्हानावर अशोक पवार यांनी उत्तर दिलं आहे. मी छोटा कार्यकर्ता असून मी अजित पवारांबद्दल काही बोलणार नाही. मात्र त्यांनी दमबाजीची भाषा वापरणे त्यांना शोभत नाही. मी माझ्या कॉलेज जीवनापासून शरद पवारांचा चाहता. त्यामुळेच,मी त्यांना सोडून जाणार नाही. मात्र, मी आमदार व्हायचं की नाही हे शरद पवार आणि जनता ठरवेल, इतर कोणी ठरवू शकत नाही,असा पलटवार त्यांनी केला.

 

माझ्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने थकित कर्ज भरल्यानंतरही नवीन कर्ज मिळाले नाही व कारखाना बंद पडला. अन्य कारखान्यांना कर्ज मिळतं मग आमच्याच कारखान्यांना कर्ज का मिळाले नाही, असा सवाल आमदार अशोक पवार यांनी उपस्थित केला.