मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raj Thackeray : "राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी फटाका, त्यांच्या..."; विनायक राऊतांची जहरी टीका

Raj Thackeray : "राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी फटाका, त्यांच्या..."; विनायक राऊतांची जहरी टीका

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 21, 2024 03:50 PM IST

Vinayak Raut On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचा कोकणात काहीच परिणाम होणार नाही, ते फुसका लवंगी फटका आहेत, अशी बोचरी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

विनायक राऊतांची राज ठाकरेंवर जहरी टीका
विनायक राऊतांची राज ठाकरेंवर जहरी टीका

Vinayak Raut on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) फूस झालेला लवंगी फटाका आहे, त्यांच्या सभेचा कोकणात काहीच परिणाम होणार नाही, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak raut) यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या सभेमुळे कोकणात (Ratnagiri Sindhudurg loks abha constituency) काही फरक पडणार नाही. अजिबात फरक पडणार नाही कारण ते फुसका लवंगी फटाका आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज ठाकरेनारायण राणेंचा प्रचार करणार असून दोघे एकाच व्यासपीठावर येणारआहेत. राज ठाकरेंच्या सभा कोकणात होणार आहेत, पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर विनायक राऊत म्हणाले की, राज ठाकरे फुसका लवंगी फटाका आहेत. त्यांच्या सभेचा कोकणात काहीच फरक पडणार नाही. लवंगी फटाकी असल्याने अजिबात फरक पडणार नाही, असं म्हटलं आहे.

विनायक राऊतांनी यावेळी महायुतीवर सडकून टीका केलीय. राऊत म्हणाले की, माझं डिपॉझिट जप्त करण्याच्या बाता मारून त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे. ४ जून पर्यंत त्यांना चांगली झोप लागेल. मात्र ४ जून नंतर त्यांची झोप उडणार आहे. भाजपचं खोटं बोल पण रेटून बोल असं चाललेलं आहे. उद्धव ठाकरे जे सांगत आहेत तेच सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांमध्ये राहिली नाही.

दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर हसू येतंय. कारण ज्या नारायण राणेंनी केसरकरांना लाथाडलं सत्तेसाठी त्यांचे तळवे चाटण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, यापेक्षा दुसरा विनोद नाही, असं विनायक राऊत म्हणाले.

 

खाल्ल्या ताटात तुम्ही घाण करणारे, केसरकरांवर निशाणा -

केसरकरांनी कोकणवासीयांना शहाणपण शिकवू नये. राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करणारा शिक्षणमंत्री म्हणून दीपक केसरकरांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल. मी साधा खासदार असताना कोकणात जेकामकेलंय ते केसरकर आयुष्यात कधी करू शकले नाहीत. केसरकरांनी येथील मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा सत्यानाश केला आहे. तुम्हाला पहिल्यांदा शरद पवारांनी आमदार केले,  उद्धव ठाकरेंनी मंत्री केले. खाल्ल्या ताटात तुम्ही घाण करणारे आहात. आज आम्ही संघटनेसोबत राहिलो आहे. संघटना वाढीसाठी काम करतोय हे आमचे मोठेपण आहे. ४ जूननंतर नारायण राणेंची झोप उडेल, असंही खासदार विनायक राऊतांनी म्हटलं.

WhatsApp channel