मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं मतदान; मतदानानंतर काय म्हणाले? वाचा

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं मतदान; मतदानानंतर काय म्हणाले? वाचा

May 20, 2024 12:28 PM IST

Raj Thackeray Cast Votes: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबासह लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले.

राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. दरम्यान, राजकीय, क्रिडा आणि अभिनय क्षेत्रापासून सर्व सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण मतदानाचा हक्क बजावत आहेत. याच पार्श्वभमूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदान केले.

ट्रेंडिंग न्यूज

राज ठाकरे यांच्यासह त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले. यानंतर पत्रकारांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मतदानाची वेळ ५ वाजेपर्यंत आहे. यामुळे मोठ्या संख्येत लोक मतदानासाठी घराबाहेर पडतील. तसेच तरुणांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा देखील घेतल्या. राज ठाकरे यांनी मनसेच्या पाडव्या मेळाव्यात यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना कंबर कसायला सांगितले.

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात कुठे-कुठे मतदान?

महाराष्ट्रात आज एकूण सहा मतदारसंघात मतदान होत आहे, ज्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघाचा समावेश आहे. मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान

महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत १३ मतदारसंघात १५.९३ टक्के मतदान झाले. धुळे- १७.३८, दिंडोरी- १९.५०, नाशिक- १६.३०, पालघर-१८.६०, भिवंडी- १४.७९, कल्याण- ११.४६, ठाणे- १४.८६, मुंबई उत्तर- १४.७१, मुंबई उत्तर पश्चिम- १७.५३, मुंबई उत्तर पूर्व- १७.०१, मुंबई उत्तर मध्य- १५.७३, मुंबई दक्षिण मध्य १६.६९ आणि मुंबई दक्षिण मतदारसंघात १२.७५ टक्के मतदान झाले.  

 

WhatsApp channel