Maharashtra Lok Sabha Election Result : महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका; दोन केंद्रीय मंत्री पराभवाच्या छायेत
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Maharashtra Lok Sabha Election Result : महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका; दोन केंद्रीय मंत्री पराभवाच्या छायेत

Maharashtra Lok Sabha Election Result : महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका; दोन केंद्रीय मंत्री पराभवाच्या छायेत

Jun 04, 2024 01:00 PM IST

Maharashtra lok sabha election result : शरद पवार गटाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का दिला असून येथे केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप उमेदवार भारती पवार पिछाडीवर पडल्या असून येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री पराभवाच्या छायेत
भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री पराभवाच्या छायेत

Maharashtra lok sabha election result2024 : देशाची उत्सुकता ताणलेल्यालोकसभा निवडणूक निकालाचे कल हळुहळू स्पष्ट होत असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत महायुतीला चितपट केले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट सर्वात चांगला असून त्यांचे १० पैकी ८ उमेदवार आघाडीवर आहेत. शरद पवार गटाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का दिला असून येथे केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप उमेदवार भारती पवार पिछाडीवर पडल्या असून येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

त्याचबरोबर भिवंडीमध्ये राज्यमंत्री कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. बाळ्यामामा म्हात्रे यांनी मोठी आघाडी घेतली आहे

सातव्या फेरी अखेर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार भारती पवार यांना एकूण १ लाख ५० हजार ४३७ इतकी मते पडली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना १ लाख ६८ हजार ९३९ इतकी मते मिळाली आहेत. भास्कर भगरे यांनी सातव्या फेरीमध्ये १८ हजार ५०२ मतांची आघाडी घेतली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे बारामतीमधून आघाडीवर आहेत तर शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार कुटूंबात अटीतटीचा सामना झाला होता. या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र बारामती थोरल्या पवारांसोबतच असल्याचे निकालाच्या कलावरून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे शिरुरमधून अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचे जाहीर आव्हान अजित पवार यांनी दिले होते. मात्र तेथेही कोल्हे मोठ्या आघाडीकडे मार्गक्रमण करताना दिसत आहेत.

दरम्यान महाविकास आघाडीच्या जागावाटत सर्वात कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लढवल्या होत्या. शरद पवार गटाचे १० उमेदवार रिंगणात होते.

 

त्यातील ८ आघाडीवर आहेत.शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवत असलेले अमोल कोल्हे, भास्कर भगरे, बजरंग सोनावणे, नीलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे, अमर काळे, सुप्रिया सुळे, धैर्यशिल मोहिते पाटील आदी उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या