मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Maharashtra Lok Sabha Winner List : कोण आहेत महाराष्ट्रातील नवनियुक्त ४८ खासदार? संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Lok Sabha Winner List : कोण आहेत महाराष्ट्रातील नवनियुक्त ४८ खासदार? संपूर्ण यादी एका क्लिकवर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 05, 2024 10:48 AM IST

Maharashtra Lok Sabha Winning Candidates List: लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत३०जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

 महाराष्ट्रातील नवनियुक्त ४८ खासदार? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील नवनियुक्त ४८ खासदार? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत३०जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. राज्यात एका अपक्षानेही बाजी मारली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्राबरोबरच या लोकसभा निवडणुकीत देशातही अनपेक्षित निकाल लागले आहेत. एनडीएला३००जागांचा आकडाही पार करणंही जमलेलं नाही. दुसरीकडे इंडिया आघाडीने २२५ च्या वर मजल मारली आहे.

ठाकरे गटाने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक२१जागा लढवल्या होत्या त्यापैकी ९ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसने१७जागा लढवून १३ जागांवर विजय मिळवलाआणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने१०जागा लढवल्या तर ८ जागांवर विजय मिळवला. महायुतीमध्ये भाजपाने सर्वाधिक२३जागा लढवल्या तर ९ जागांवर विजय मिळवला. शिंदे गट१५ जागा लढवून ७ जागा जिंकलाआणि अजित पवार गट४जागांवर निवडणूक लढला होता. त्यांना केवळ १ जागा जिंकता आली. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत.

पाहा महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी ( Maharashtra Lok Sabha Winning Candidates List)

 

अ.क्र.लोकसभा मतदारसंघविजयी उमेदवारपराभूत उमेदवार
दक्षिण मुंबईअरविंद सावंत (ठाकरे गट)यामिनी जाधव (शिंदे गट)
दक्षिण मध्य मुंबईअनिल देसाई (ठाकरे गट) राहुल शेवाळे (शिंदे गट)
उत्तर मध्य मुंबईपियूष गोयल (भाजपा)भूषण पाटील (काँग्रेस)
मुंबई उत्तर मध्य वर्षा गायकवाड (काँग्रेस)उज्ज्वल निकम (महायुती)
मुंबई ईशान्य संजय दिना पाटील (महाविकास आघाडी)मिहीर कोटेचा (महायुती)
मुंबई-उत्तर पश्चिमरवींद्र वायकर (महायुती) अमोल किर्तीकर (महाविकास आघाडी)
साताराउदयनराजे भोसले (भाजपा)शशिकांत शिंदे (ठाकरे गट)
जळगावस्मिता वाघ (भाजपा)करण पवार (महाविकास आघाडी)
शिर्डीभाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट)सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
१०रायगडसुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार)अनंत गीते (महाविकास आघाडी)
११सांगलीविशाल पाटील (अपक्ष)चंद्रहार पाटील, संजयकाका पाटील
१२नागपूरनितीन गडकरी (भाजपा)विकास ठाकरे (काँग्रेस)
१३पुणेमुरलीधर मोहोळ (भाजप)रवींद्र धंगेकर, वसंत मोरे
१४रत्नागिरी-सिंधुदुर्गनारायण राणे (भाजप)विनायक राऊत (महाविकास आघाडी)
१५बुलढाणाप्रतापराव जाधव (महायुती)नरेंद्र खेडेकर (महाविकास आघाडी)
१६नंदुरबारगोवाल पाडवी (महाविकास आघाडी)हिना गावित (महायुती)
१७धुळेशोभा बच्छाव (महाविकास आघाडी)सुभाष भामरे (महायुती)
१८रावेररक्षा खडसे (महायुती)रवींद्र पाटील (महाविकास आघाडी)
१९अकोलाअतुल धोत्रे (महायुती) अभय पाटील (महाविकास आघाडी)
२०अमरावतीबळवंत वानखेडे (काँग्रेस)नवनीत राणा (भाजप) 
२१वर्धा अमर काळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)रामदास तडस (भाजप)
२२रामटेकरश्मी बर्वे (काँग्रेस)राजू पारवे (महायुती)
२३भंडारा-गोंदियाडॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस)सुनील मेंढे (महायुती)
२४गडचिरोली-चिमूरडॉक्टर नामदेव किरसान (काँग्रेस)अशोक नेते (महायुती)
२५चंद्रपूरप्रतिभा धानोरकर (काँग्रेस)सुधीर मुनगंटीवार (भाजप)
२६यवतमाळ - वाशिमसंजय देशमुख (शिवसेना उद्धव ठाकरे गट)राजश्री पाटील (महायुती)
२७हिंगोलीनागेश आष्टीकर  (शिवसेना उद्धव ठाकरे गट)बाबूराव कदम (महायुती)
२८नांदेडबाबूराव कदम (काँग्रेस)प्रताप पाटील चिखलीकर (महायुती)
२९परभणीसंजय जाधव (महायुती) महादेव जानकर (महाविकास आघाडी
३०जालनाकल्याण काळे (काँग्रेस)रावसाहेब दानवे (महायुती)
३१औरंगाबादसंदीपान भुमरे (शिंदे गट) चंद्रकांत खैरे
३२दिंडोरीभास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार)डॉ. भारती पवार (महायुती)
३३नाशिकराजाभाऊ वाजे (शिवसेना उद्धव गट)हेमंत गोडसे (शिंदे गट)
३४पालघर हेमंत सावरा (महायुती) भारती कामडी (महाविकास आघाडी)
३५भिवंडीसुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे (राष्ट्रवादी शरद पवार)कपिल पाटील (महायुती)
३६कल्याण श्रीकांत शिंदे (शिंदे गट)वैशाली दरेकर (ठाकरे गट)
३७ठाणेनरेश म्हस्के (महायुती)राजन विचारे (महाविकास आघाडी)
३८मावळश्रीरंग बारणे (महायुती)संजोग वाघेरे (महाविकास आघाडी)
३९बारामतीसुप्रिया सुळे (महाविकास आघाडी)सूनेत्रा पवार (महायुती)
४०शिरुरअमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार)शिवाजी आढळराव पाटील (महायुती)
४१अहमदनगरनिलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार)निलेश लंके (महायुती)
४२बीडबजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार)पंकजा मुंडे (भाजप)
४३धाराशीवओमराजे निंबाळकर (महाविकास आघाडी)अर्चना पाटील (महायुती)
४४लातूर शिवाजीराव काळगे (महाविकास आघाडी)सुधाकर श्रृंगारे (महायुती
४५सोलापूरप्रणिती शिंदे (काँग्रेस)राम सातपुते (भाजपा)
४६माढाधैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार)धैर्यशील मोहिते पाटील (महायुती)
४७कोल्हापूरशाहू महाराज छत्रपती (काँग्रेस)संजय मंडलिक (शिंदे)
४८हातकणंगलेधैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)सत्यजीत पाटील (महाविकास आघाडी) राजू शेट्टी

WhatsApp channel