मराठी बातम्या  /  elections  /  Mahadev Jankar : ‘रासप’चं ठरलं! शरद पवारांना धक्का देत महादेव जानकरांची महायुतीला साथ

Mahadev Jankar : ‘रासप’चं ठरलं! शरद पवारांना धक्का देत महादेव जानकरांची महायुतीला साथ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 24, 2024 07:33 PM IST

Mahadev Jankar support Mahayuti : महादेव जानकर आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले. महायुतीत रासपसाठी लोकसभेची एक जागा सोडली जाणार आहे.

महादेव जानकरांची महायुतीला साथ
महादेव जानकरांची महायुतीला साथ

राज्याच्या राजकारणातमोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज (रविवार) महादेव जानकर आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले. महादेव जाणकरांच्या या निर्णयाने शरद पवारांना धक्का बसला आहे. महायुती लोकसभेसाठी रासपसाठी एक जागा सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महादेव जानकर मागील काही दिवसांपासूनभाजप तसेचमहायुतीत नाराजअसल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर जानकर यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळीक वाढल्याचे दिसत होते. माढा लोकसभा मतदारसंघातून जानकर महाआघाडीकडून लढणार असल्याचे सांगितले जात होते. याबद्दल जानकरांनी शरद पवारांचे आभारही मानले होते. त्यामुळे जानकर महाविकास आघाडीत सामील होण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली होती. मात्र आज महादेव जानकरांनीआपण महायुतीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महादेव जानकर यांच्याशीचर्चा केली. त्यानंतर महादेव जानकरआपला निर्णय जाहीर केली. यावेळीराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते.

महादेव जानकर यांच्यासोबत बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, महादेव जानकर यांनी बैठकीत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकासहोत असून त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. त्यामुळे आपण मोदींच्या सोबतच राहणार आहोत. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलं आहे.

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. महायुतीच्या या निवेदनात म्हटलं असून त्याखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महादेव जानकरयांच्या सह्या आहेत.

WhatsApp channel