Madha lok sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांत मतदान पार पडलं. यादरम्यान सोलापूर जिल्ह्यातील दोन घटनांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. सोलापूर मतदार संघातील सांगोला तालुक्यात एका तरुणाने मतदानासाठी जात पेट्रोल टाकून ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे माढ्यातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याने आपल्यासोबत मतदानासाठी कांदा सोबत नेला होता. त्याने मशीनवर कांदा ठेवला आणि त्यानंतर तुतारीचे बटण दाबले.
भाजपने लादलेली कांदा निर्यातबंदी त्यांना रडवणार असल्याचे दिसत आहे. मंगळवारी सकाळी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळच्या सुमारास करमाळा तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याने ईव्हीएमवर कांदा ठेऊन मतदान केले. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या शेतकऱ्यांना कांद्याने ईव्हीएमचे बटन दाबून सरकारविरुद्धचा राग व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने गेल्यावर्षा नोव्हेंबर महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याविरोधात कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी अनेक आंदोलने केली होती. कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी अशी मागणी शेतकरी करत होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी गुजरातच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यातीस परवानगी दिली. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर सर्व राज्यातील कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली आहे.
कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर कांद्याचे दर घाऊक आणि किरकोळ बाजारात बदलले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यानेईव्हीएमवरकांदा ठेवून कमळाचे नाही तर तुतारीसमोरचे बटण दाबले. शेतकऱ्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून याची तुफान चर्चा रंगली आहे.
केंद्र शासनाचा कांद्यावरील निर्यात खुली केल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाली असून ५लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.
ईव्हीएम हॅक (EVM Hacker ) करतो असे म्हणत ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला छत्रपती संभाजीनगरमधून एकाला अटक केली आहे.दानवेंना फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करणारा व्यक्ती हा सैन्य दलात सध्या तो सुट्टीवर आला आहे. त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. दानवेंना त्याने आपली ओळख मेजर अशी करून दिली होती.