Narendra Modi : 'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोकं...', पंतप्रधान मोदींचं ठाकरेंच्या वर्मावर बोट-loksabha elections 2024 pm narendra modi targets uddhav thackeray says duplicate shivsena ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Narendra Modi : 'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोकं...', पंतप्रधान मोदींचं ठाकरेंच्या वर्मावर बोट

Narendra Modi : 'काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोकं...', पंतप्रधान मोदींचं ठाकरेंच्या वर्मावर बोट

Apr 09, 2024 12:09 AM IST

Narendra Modi on Uddhav Thackeray : मोदींनी ठाकरे गटाचाउल्लेख नकली शिवसेना (duplicate shivsena) असा केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार एकनाथ शिंदे व त्यांचा गट पुढं घेऊन जात असल्याचं म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी  ठाकरे गटाला नकली शिवसेना म्हटलं
पंतप्रधान मोदींनी ठाकरे गटाला नकली शिवसेना म्हटलं

 PM Narendra Modi in Chandrapur : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपुरातून फोडला आहे. विदर्भात लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. १० वर्षानंतर चंद्रपूरमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत मोदींनी इंडिया आघाडी तसेच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना (Narendra modi targets uddhav Thackeray) पुन्हा डिवचलं आहे. 

मोदींनी ठाकरे गटाचा उल्लेख नकली शिवसेना (duplicate shivsena) असा केला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार एकनाथ शिंदे व त्यांचा गट पुढं घेऊन जात असल्याचं म्हटले आहे. याचा मला आनंद आहे’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, मोदी दुसऱ्या राज्यात जातात आणि काँग्रेस आणि आर्टिकल ३७० बद्दल का बोलतात. काश्मीर आपलं आहे की नाही?  काश्मीरमध्ये पंडितांच्या हत्या होत असताना त्यांची घरे जाळली जात असताना बाळासाहेब ठाकरेंनी उघडपणे काँग्रेसविरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी महाराष्ट्र व काश्मीरचा काय संबंध असा विचार केला नाही. मात्र आता इंडिया आघाडीचे लोक दक्षिण भारताला देशापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. सनातन धर्माला डेंग्यूची उपमा देत आहेत. काँग्रेस आणि नकली शिवसेनेची लोक त्याच नेत्यांना महाराष्ट्रात बोलावून रॅली काढत आहेत. 

काँग्रेसच दहशतवाद्यांना संरक्षण देत होती - मोदी

मोदी म्हणाले काँग्रेसच्या जाहिरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा वापरली जात आहे.  स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी देशाचं विभाजन केलं अन् देश स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीरमध्येही त्यांनीच अडचणी निर्माण केल्या. आपल्या आजूबाजूचे देश प्रगती करत असताना भारत दहशतवादाने ग्रासलेला होता. काँग्रेसच दहशतवाद्यांना संरक्षण देत होती. माओवाद्याची लाल दहशत काँग्रेसमुळे वाढली. राम मंदिर निर्माणाचा विषय अनेक वर्षांपासून का रखडलेला होता, कारण राम मंदिराच्या कामात काँग्रेसच अडथळा आणत होतं. यासाठी न्यायालयाचा आधार घेतला जात होता. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर कुणी विरोध केला, अशी टीकाही मोदींनी केली.

Whats_app_banner