Uddhav Thackeray : आगामी लोकसभा ही 'वाघ विरुद्ध लांडगे', उद्धव ठाकरेंचा शहा-शिंदेंवर हल्लाबोल
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Uddhav Thackeray : आगामी लोकसभा ही 'वाघ विरुद्ध लांडगे', उद्धव ठाकरेंचा शहा-शिंदेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : आगामी लोकसभा ही 'वाघ विरुद्ध लांडगे', उद्धव ठाकरेंचा शहा-शिंदेंवर हल्लाबोल

Mar 08, 2024 06:42 PM IST

Uddhav Thackeray On Amit Shah :उद्धव ठाकरे यांनी२०१९ मधील निवडणुकीदरम्याचा किस्सा सांगितला. अमितशहा यांनी मला फोन करून सांगितलं होतं की,उद्धवजी आप को आना होगा. मला वाराणसीमध्ये भाजपाचा प्रचार करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं.

जनसंवाद यात्रेत उद्धव ठाकरेंचा शहा-शिंदेंवर हल्लाबोल
जनसंवाद यात्रेत उद्धव ठाकरेंचा शहा-शिंदेंवर हल्लाबोल

मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कळंब येथे जनसंवाद सभा पार पडली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. येणारी लोकसभा निवडणूक ही वाघ विरुद्ध लांडगे आणि गद्दार विरुद्ध इमानदारअशी होणार आहे, असा नारा उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला. हिंदुत्वावर बोलताना राम राम करून नुस्तं घंटा वाजवणारे आमचे हिंदूत्व नाही, देवेंद्र फडणवीस तुम्ही जाहीर करा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री आहात, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

एक गोष्ट खरी आहे की माझ्या मनात कधीही मुख्यमंत्रीपद नव्हते. परिस्थिती अशी निर्माण झाली की भारतीय जनता पक्षाने आपल्याला दगा दिला. पाठीत वार केला. अमित शहा यांनी बाळासाहेब यांच्या खोलीत जिथे आम्ही त्याला मंदिर मानतो, त्या खोलीमध्ये मला हा शब्द दिला होता. त्यांनी दगा दिला, पण मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी २०१९ मधील निवडणुकी दरम्याचा किस्सा सांगितला. अमित शहा यांनी मला फोन करून सांगितलं होतं की, उद्धवजी आप को आना होगा. मला वाराणसीमध्ये भाजपाचा प्रचार करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. आता भाजपने पाठित वार केला. शिवसेना प्रमुखांनी गुजरात हत्याकांड प्रकरणातून मोदींना वाचवलं होतं. मोदींमुळे शिवसेना नाही तर शिवसेनाप्रमुखांमुळे मोदी आहेत, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना उद्धव म्हणाले की, नार्वेकर हे लबाड आहेत, उमेदवारीसाठी त्यांना आमच्याविरोधात निकाल दिल्याचाआरोप उद्धव ठाकरे यांनी केला. राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल विरोधात वाटत नाही का? असा सवाल सुप्रीम कोर्टानेही उपस्थित केल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

भाजप हा वापर करून फेकून देणारा पक्ष आहे. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे आमचं कुटुंबीय होतं, पण संकटकाळात ज्यांनी मदत केली त्यांना संपवण्याचं काम भाजप करत आहे. नितीन गडकरीना तिकीटासाठी ताटकळत ठेवलं आहे. पंकजा मुडेंबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचं काम भाजपकडून सुरु असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

Whats_app_banner