मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात २५८ उमेदवार रिंगणात

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात २५८ उमेदवार रिंगणात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 23, 2024 12:26 AM IST

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. राज्यातील ११ मतदारसंघात २५८ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार संख्या बारामती मतदारसंघात असून येथे ३८ जण नशीब आजमावत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात २५८ उमेदवार रिंगणात
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात २५८ उमेदवार रिंगणात

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ३१७ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : रायगड १३, बारामती ३८, धाराशीव (उस्मानाबाद) ३१, लातूर २८, सोलापूर २१, माढा ३२,सांगली २०,सातारा १६, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ९, कोल्हापूर २३, हातकणंगले २७ अशी आहे.

११ मतदारसंघातील मुख्य मुख्य लढती -

रायगड :

सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार)

अनंत गीते (शिवसेना ठाकरे)

बारामती :

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)

सुनेत्रा पवार ( राष्ट्रवादी अजित पवार)

धाराशीव :

ओमराजे निंबाळकर ( शिवसेना ठाकरे)

अर्चना राणा पाटील ( राष्ट्रवादी अजित पवार)

लातूर :

शिवाजीराव काळगे ( काँग्रेस)

सुधाकर शृंगारे ( भाजप)

सोलापूर :

प्रणिती शिंदे( काँग्रेस)

राम सातपूते ( भाजप)

माढा :

रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( भाजप)

धैर्यशील मोहिते-पाटील ( राष्ट्रवादी शरद पवार )

सांगली :

संजयकाका पाटील ( भाजप)

चंद्रहार पाटील ( शिवसेना ठाकरे)

विशाल पाटील ( अपक्ष)

सातारा :

उदयनराजे भोसले ( भाजप)

शशिकांत शिंदे ( राष्ट्रवादी शरद पवार)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग :

विनायक राऊत ( शिवसेना ठाकरे)

नारायण राणे ( भाजप)

कोल्हापूर :

शाहू महाराज छत्रपती ( काँग्रेस)

संजय मंडलिक ( शिवसेना शिंदे)

हातकणंगले :

राजू शेट्टी ( स्वाभिमानी)

धैर्यशील माने ( शिवसेना शिंदे)

सत्यजित पाटील ( शिवसेना ठाकरे)

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी २३ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार -

मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अद्याप मतदार म्हणून नावनोंदणी केली नाही आणि पहिल्यांदा नव्याने नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या बेघर,देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी, भटक्या विमुक्त जाती-जमाती या प्रवर्गातील नागरिक हे २३ एप्रिल पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने कोणत्याही ओळखपत्राविना स्व-घोषणापत्राद्वारे नाव नोंदवू शकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. काही कारणास्तव ज्या मतदारांचे नाव नोंदवायचे राहीले असेल त्यांनी तातडीने २३ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा मतदाता हेल्पलाईन ॲपच्या सहाय्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करावी किंवा आपल्या क्षेत्रातील मतदार दुतांची मदत घ्यावी.

WhatsApp channel