मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election Results: भाजपच्या 'अबकी बार ४०० पार' मोहिमेची खिल्ली, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Lok Sabha Election Results: भाजपच्या 'अबकी बार ४०० पार' मोहिमेची खिल्ली, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 04, 2024 06:45 PM IST

Lok Sabha Election Results 2024 memes: लोकसभा निवडणुकीतील एक्झिट पोलचे आकडे व आज जाहीर झालेल्या निकालाशी काहीच मेळ लागत नाही. ज्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी एक्जिट पोल वाल्यांना तसेच भाजपला ट्रोल केलं आहे.

भाजपच्या 'अबकी बार ४०० पार' मोहिमेची खिल्ली, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
भाजपच्या 'अबकी बार ४०० पार' मोहिमेची खिल्ली, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Election Results 2024 memes : सहा आठवडे चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामानंतर आज सकाळपासून मतमोजणी सुरू असून अनेक जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एनडीएला ४०० पार जागा मिळवून तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी जंग-जंग पछाडले होते. त्यांनी देशभरात २०० हून अधिक सभा, रोड शो केले होते. अनेक एक्झिट पोल्सनी भाजपला ३५० पार तर काहींनी ४०० पार जागा दाखवल्या होत्या. मात्र आज निकाल याच्या विपरीत लागल्यानं भाजपच्या गोटात निराशा पसरली असून इंडिया आघाडीत उत्साह आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान नेटीझन्सकडून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊल पाडला जात आहे.निवडणूक निकालाच्या तीन दिवस आधी एक्झिट पोल समोर आले होते. त्यामध्ये व्यक्त केलेल्या भाकितांच्या बिल्कूल विपरीत निकाल लागले आहेत. एक्झिट पोलचे आकडे व सध्याच्या निकालाशी काहीच मेळ लागत नाही. ज्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी एक्जिट पोल वाल्यांना तसेच भाजपला ट्रोल केलं आहे.

१ जून रोजी जाहीर झालेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोल हे भाजपाच्या बाजूनं कल दाखवत होते. काही एक्झिट पोलमध्ये तर भाजपा ४१४ च्याही पलिकडे जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण निकालाची आकडेवारी जसजशी समोर आली तसे भाजपच्या गोटात खळबळ माजली. भाजपच्या महाशक्तीशाली प्रचार यंत्रणेला INDIA ने चांगलीच टक्कर दिली आहे. ज्यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठतानाच घाम फुटला आहे.

भाजपला सर्वात मोठा हादरा उत्तरप्रदेशमध्ये बसला आहे. तेथील जागा निम्म्याहून कमी झाल्या आहेत. त्यातच गेल्या दोन निवडणुकीत साथ देणारं महाराष्ट्रासारखेही राज्यही एनडीएच्या हातातून निसटताना दिसत आहे. बंगालमध्येही ममता बॅनर्जींनी मोदींचा चौखुर उधळणारा वारू रोखण्यात यश मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर आता नेटकरी एक्सिट पोल जाहिर करणाऱ्यांना आणि बीजेपीला ट्रोल करत आहे. (Lok sabha result memes) चला पाहुयात काही मजेशीर आणि ट्रेंडिंग मीम्स..

नितीश कुमार यांच्यावरही मीम्स -

नितीश कुमार यांच्यावर व्हायरल मीम्स
नितीश कुमार यांच्यावर व्हायरल मीम्स
शेअर बाजारवरही मीम्स
शेअर बाजारवरही मीम्स
व्हायरल मीम्स
व्हायरल मीम्स
व्हायरल मीम्स
व्हायरल मीम्स
WhatsApp channel