मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha polls : देशातील ‘या’ मतदारसंघात मतदानात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक

Lok Sabha polls : देशातील ‘या’ मतदारसंघात मतदानात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक

May 29, 2024 10:42 PM IST

Lok Sabha polls: अलाहाबाद लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांनी मतदानाच्या बाबतीत पुरुषांना मागे टाकले आहे, तर फुलपूर मतदारसंघात पुरुषांनी जास्त मतदान केले. मेजा आणि कोरांव मध्ये सर्वाधिक महिला मतदान झाले.

प्रतिकात्मक फोटो  (HT File Photo)
प्रतिकात्मक फोटो (HT File Photo)

लोकसभा निवडणूक २०२४ च्या सहाव्या टप्प्यात २५ मे रोजी झालेल्या मतदानात प्रयागराजच्या अलाहाबाद लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा जास्त मतदानाचा हक्क बजावला. मात्र, फुलपूर मतदारसंघात महिलांपेक्षा पुरुषांनी जास्त मतदान केल्याचे निवडणूक आयोगाच्या नोंदीवरून दिसून येते.

ट्रेंडिंग न्यूज

अलाहाबाद मतदारसंघात महिलांचे पुरुषांपेक्षा अधिक मतदान -

अलाहाबाद आणि फुलपूर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या १० विधानसभा मतदारसंघांतील मतदानाची लिंगनिहाय आकडेवारी विचारात घेतली तर असे दिसून येते की, अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातील मेजा आणि कोरोन विधानसभा मतदारसंघ, तसेच फुलपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत फाफामऊ आणि सोरांव विधानसभा मतदारसंघातील महिलांनी मतदानात पुरुषांना मागे टाकले.  याउलट इतर सहा मतदारसंघांत महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मतांची टक्केवारी अधिक असल्याचे दिसून आले.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, अलाहाबाद लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानात महिला मतदारांच्या मतांचा वाटा ५२.०८ टक्के होता, तर पुरुषांचा वाटा केवळ ५१.६१ टक्के होता. अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातील मेजा विधानसभा मतदारसंघात महिलांनी उत्साहाने मतदान केले. येथे महिलांचे मतदानाचे प्रमाण ५५.११ टक्के होते, तर पुरुषांचे मतदान केवळ ५०.२७ टक्के होते.

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मतदानात सहभाग अधिक होता, मात्र मेजा येथे महिला व पुरुष मतांमधील तफावत ४.८४ टक्के इतकी होती. अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातील कोरांव विधानसभा मतदारसंघातही महिलांनी पुरुषांपेक्षा ४.०६ टक्के अधिक मतदान केले. येथे पुरुषांची मतदानाची टक्केवारी ५५.०१% आणि महिलांची ५९.०७% होती.

दुसरीकडे फुलपूर लोकसभा मतदारसंघात महिलांच्या तुलनेत पुरुषांची मतदानाची टक्केवारी अधिक असून ४९.३० टक्के पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ४८.४५ टक्के इतकी नोंदली गेली.

फुलपूर लोकसभा मतदारसंघातील फाफामऊ आणि सोरांव विधानसभा मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिलांची मतदानाची टक्केवारी अधिक होती. फाफामऊ विधानसभा मतदारसंघात पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ५२.४८ टक्के तर महिलांचे मतदान ५३.७७ टक्के होते.

फुलपूर लोकसभा मतदारसंघातील सोरांव विधानसभा मतदारसंघात एकूण पात्र पुरुष मतदारांपैकी  ५४.५६ टक्के तर महिलांचे मतदान ५६.५३ टक्के राहिले.

WhatsApp channel