मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Narendra Modi :...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; मोदींचा रामटेकमधून सवाल

PM Narendra Modi :...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; मोदींचा रामटेकमधून सवाल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 10, 2024 08:13 PM IST

PM Narendra Modi : एका गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाला म्हणून लोकशाही, संविधान धोक्यात असल्याचं दिसू लागलं. इंडिया आघाडी कधीही गरिबांना पुढे येताना पाहू शकत नाही, अशी टाका मोदींनी काँग्रेसवर केली आहे.

रामटेकमधील सभेत बोलताना नरेंद्र मोदी
रामटेकमधील सभेत बोलताना नरेंद्र मोदी

Narendra Modi In Ramtek : चंद्रपूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रामटेकमध्ये सभा झाली. यावेळी मोदींनी जनेतला आवाहन केले की, यावेळी तुम्हाला केवळ खासदार निवडायचा (Lok sabha elections) नसून पुढच्या हजार वर्षांसाठी मजबूत भारताचा पाया रचायचा आहे. काँग्रेसने गेल्या ७० वर्षात देशातील ओबीसी, एससी आणि एसटी समुदायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं,पण भाजप सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षात गरीबांसाठी अनेक योजना मार्गी लागल्याने त्यांचे जीवन सुकर झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या दहा वर्षात फक्त जेवणापूर्वी जे समोर येतं ते स्टार्टर आलं आहे, आता विकासाची पूर्ण थाळी समोर येणार आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मोदींची आज रामटेकमध्ये सभा झाली.

इंडिया आघाडीवर टीका करताना मोदी म्हणाले की, इंडी नेते पूर्ण ताकदीने देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.संविधान धोक्यात असल्याच्या नावावर खोटं पसरवणाऱ्यांना माझा सवाल आहे की,काँग्रेसनं एक देश, एक संविधान का लागू केलं नाही. जर तुम्हाला संविधानाची काळजी होती तर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पूर्ण भारतात लागू करण्याची हिंमत का दाखवली नाही. ७० टक्के संविधान संपूर्ण देशात लागूकेलं नाही. मात्र आम्ही सत्तेत येताच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात डॉ. आंबेडकरांचे संविधान लागू केले. काँग्रेसनं कलम ३७० ला हात लावला नाही. त्यामुळेजम्मू काश्मीरचे संविधान वेगळे होतं. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर तेथे रक्ताचे पाट वाहतील म्हणणारी काँग्रेसच होती. मात्र असे झाले का?  त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर जिथे कुठे असतील ते मोदींला आशीर्वाद देतील.

देशातील कुठलीही निवडणूक आली की, विरोधक लोकशाही वाचवण्याचा नारा देतात. मग आणीबाणीच्या काळात लोकशाही धोक्यात नव्हती का? एका गरीबाचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला म्हणून लोकशाही, संविधान धोक्यात असल्याचं खोटं पसरवलं जात आहे. मात्र माझ्यावर कितीही हल्ले झाले तरी मी जनतेच्या सेवेपासून मागे हटणार नाही. इंडिया आघाडीचे नेते जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. जर यांना ताकद दिली तर देशात फूट पडेल.

इंडिया आघाडीकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नकेला जात आहे. रामटेकमध्ये प्रभू रामाचे चरणस्पर्श झाले आहेत. यावेळी रामनवमीला अयोध्येत रामलल्ला झोपडीत नाही तर भव्य मंदिरात दर्शन देतील. ५०० वर्षांनी हा क्षण आला होता. मात्र काँग्रेसने रामलल्लाचा अपमान केला आहे.

 

त्यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रणही नाकारले. सनातन धर्मावर टीका करतात. हिंदू धर्मातील शक्तीला संपवण्याची भाषा केली जात आहे. या निवडणुकीत त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहू नका.

WhatsApp channel