Lok Sabha Election : चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, इतक्या EVM वर होणार मतदान-lok sabha elections 2024 maharashtra fourth phase polling how many evm machines ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election : चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, इतक्या EVM वर होणार मतदान

Lok Sabha Election : चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, इतक्या EVM वर होणार मतदान

May 11, 2024 11:55 PM IST

Lok Sabha Election 4th phase Polling : चौथ्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता झाली. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान १३  मे रोजी घेण्यात येणार आहे. या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्या. यात टप्प्यात सुजय विखे, निलेश लंके व पंकजा मुंडे यांचे नशीब ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. या टप्प्यातील ११लोकसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी निवडणूक आयोगाने एकूण ५३हजार ९५९ बॅलेट युनिट उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदुरबार, जळगाव,  रावेर, जालना, औरंगाबाद,  मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा एकूण ११ लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी २९हजार २८४  मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण ५३हजार ९५९ बॅलेट युनिट, २३हजार २८४ कंट्रोल युनिट आणि २३  हजार २८४  व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यात नंदुरबार मतदारसंघामधील २११५  मतदान केंद्रांसाठी २११५  बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, जळगावमधील १९८२ मतदान केंद्रासाठी १९८२बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, रावेरमधील १९०४ मतदान केंद्रांसाठी ३८०८बॅलेट युनिट तर १९०४ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, जालनामधील २०६१मतदान केंद्रांसाठी ४१२२ बॅलेट युनिट आणि २०६१कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, औरंगाबादमधील २०४० मतदान केंद्रांसाठी ६१२०बॅलेट युनिट आणि २०४० कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, मावळमधील २५६६मतदान केंद्रांसाठी ७६९८ बॅलेट युनिट आणि २५६६ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, पुणेमधील २०१८ मतदान केंद्रांसाठी ६०५४बॅलेट युनिट आणि  २०१८  कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिरूरमधील २५०९ मतदान केंद्रांसाठी ७५२७ बॅलेट युनिट आणि  २५०९कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, अहमदनगरमधील २०२६ मतदान केंद्रांसाठी ४०५२बॅलेट युनिट आणि २०२६ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिर्डीमधील १७०८मतदान केंद्रांसाठी ३४१६ बॅलेट युनिट आणि १७०८कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, बीडमधील २३५५ मतदान केंद्रांसाठी ७०६५बॅलेट युनिट आणि २३५५ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

चौथ्या टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणुकीसाठी लागणारे साहित्य साधनसामग्री मतदान केंद्रांवर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन करून त्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन झाले आहे.

राज्यातील चौथ्या टप्यात ११ लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानासाठी भारत निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आचारसंहिता उल्लंघनाच्या घडामोडींवर कारवाई करण्यासाठी विविध भरारी पथके, स्थीर सनियंत्रण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासह साहित्य, ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.