Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

Lok Sabha Elections 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपला, महाराष्ट्रात २० मे रोजी शेवटचं मतदान!

Updated May 18, 2024 09:57 PM IST

Maharashtra Lok Sabha Elections 2024 Fifth Phase: महाराष्ट्रात येत्या सोमवारी पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात सहा मतदारसंघात मतदान होणार आहे.

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात यंदा पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होत आहे.
Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात यंदा पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होत आहे. (HT)

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार शनिवारी (१८ मे २०२०) संपला. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात सोमवारी (२० मे २०२४) मुंबईसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघात मतदान होईल. यानंतर महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया संपणार आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका वड्रा यांसारखे राष्ट्रीय नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आदी राज्यांचे नेते लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसत आहेत.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट असतानाही लोकसभेची निवडणूक पार पडली. भाजपने विकासात्मक मुद्द्यांवर आणि व्होटबँकेच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले असताना इंडिया आघाडीने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीवर बेरोजगारी आणि महागाई यासारख्या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या समर्थकांमध्ये कडवी लढत पाहायला मिळाली, ज्यांनी २०१९ च्या निवडणुकीत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. मात्र, आता सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यंदाच्या निवडणुकीत बहुमताचा विश्वास व्यक्त करत आहेत.

'या' नेत्यांमध्ये चुरशीची लढत

राजकीय जाणकारांच्या मते ईशान्य मतदारसंघात मिहीर कोटेचा (भाजप) आणि संजय दिना पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मध्य मतदारसंघात अनिल देसाई (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राहुल शेवाळे (शिंदे गट) आणि रवींद्र वायकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी रोड शो आणि रॅलींवर भर दिला. उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकर आणि संजय दिना पाटील यांचा रोड शो आणि अनिल देसाईंच्या समर्थनार्थ दादरमध्ये सभा घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी, मुलुंड आणि ठाण्यातही सभा घेतल्या. मिहीर कोटेचा यांdच्या समर्थनार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोड शो केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझगाव, कोपरी ठाणे आणि मीरा-भाईंदर भागात रॅली आणि रोड शो केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या