Mumbai Slow Voting : मुंबईत मतदान संथ गतीनं का झालं? किती ठिकाणी झाला घोळ? अखेर निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Mumbai Slow Voting : मुंबईत मतदान संथ गतीनं का झालं? किती ठिकाणी झाला घोळ? अखेर निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट

Mumbai Slow Voting : मुंबईत मतदान संथ गतीनं का झालं? किती ठिकाणी झाला घोळ? अखेर निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट

May 22, 2024 10:40 AM IST

Mumbai Lok sabha Election : मुंबईत संथ मतदान, मतदार यादीतून नावे गायब तसेच ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याबद्दल निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबईतील निवडणूक घोळाबाबत निवडणूक आयोगाचं केलं स्पष्ट
मुंबईतील निवडणूक घोळाबाबत निवडणूक आयोगाचं केलं स्पष्ट

Complaints of slow voting in Mumbai : सोमवारी (२० मे) रोजी लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात व महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यातील १३ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. याच दिवशी मुंबईतील ६ मतदान केंद्रावर मतदान झालं.  (Low voting turnout in Mumbai) यामध्ये मुंबईतील सर्वच मतदारसंघातून संथ गतीने मतदान झाल्याच्या तसेच रांगेत अनेक तास ताटकळत अभे राहूनही अनेकजण मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. 

अनेक मतदारांची मतदान यादीतून नावे गायक, मतदान यंत्रात बिघाड तसेच संथ गतीने होत असलेल्या मतदानावरून उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपवर आरोप केले होते. तसेच जेथे ठाकरे गटाला अधिक मतदान होत आहे तेथील मतदान प्रक्रियेत घोळ घातल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. भाजपनेही संथ मतदानाबद्दल तक्रार केली होती. आता या संपूर्ण गोंधळावर महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबईमध्ये ६ लोकसभा मतदारसंघात १२ हजार पोलिंग बूथ आहेत, तिथे व्यवस्थित प्रक्रिया पार पडली. केवळ १० ते १२ बुथवर मंद गतीने मतदान झाले आहे, असं महाराष्ट्र राज्याचे सहसचिव अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

त्यांनी सांगितले की, ईव्हीएम आणि इतर अडचणी दूर करून राखीव स्टॉकमधील ईव्हीएम उपलब्ध करून दिल्या. राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपांवर मी बोलणार नाही’, असं किरण कुलकर्णी म्हणाले.

मतदार यादीतील घोळाबाबत निवडणूक आयोगानं म्हटले आहे की, मतदानाच्या दिवशी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासणं योग्य नाही. सुजाण नागरिकांना हे लक्षात आलं पाहिजे. आयोगाकडून यादी नाव तपासून घेण्यासंदर्भात २१ एप्रिलला जाहिरात दिली होती. आता ज्यांचे नाव नव्हते त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, विधानसभेला त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील मतदान संपले असले तरी नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे. मुख्य सचिवांमार्फत काही प्रस्ताव आमच्याकडे आले होते, ते आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले आहेत. पावसाळ्याआधी काही महत्त्वाची कामं करण्यासंबंधी, याबाबत निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करण्यासंबंधी परवानगी दिली आहे, मात्र पूर्ण आचारसंहिता शिथिल होणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

Whats_app_banner