मराठी बातम्या  /  elections  /  Lok Sabha Election: काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 'या' नेत्यांच्या मुलांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं!

Lok Sabha Election: काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 'या' नेत्यांच्या मुलांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 12, 2024 07:42 PM IST

Congress Releases 2nd List of 43 Candidates: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रसने ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

Congress Candidates 2nd List for Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पक्षातील जेष्ठ नेत्यांच्या मुलांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ, अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत आणि काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांची या यादीत नावे आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सोमवारी (११ मार्च २०२४) मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक झाली आणि आसाम, मध्य प्रदेश, राजस्थानमधील सुमारे ४३ नावांची यादी मंजूर करण्यात आली,' अशी माहिती केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी दिली.

Lok Sabha Election: लोकसभेसाठी महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार ठरले, ‘या’ ८ उमेदवारांची घोषणा होणार!

केसी वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस खासदार गौरव गोगोई आसामच्या जोरहाटमधून, नकुलनाथ मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि राहुल कसवा राजस्थानच्या चुरूमधून आणि वैभव गेहलोत जालोरमधून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत ४३ उमेदवारांपैकी १० सामान्य उमेदवार, १३ ओबीसी उमेदवार, १० एससी उमेदवार, ०९ एसटी उमेदवार आणि ०१ मुस्लिम उमेदवार आहेत.

Mahayuti seat sharing : आरएसएसच्या 'त्या' आग्रहामुळं रखडलं महायुतीचं महाराष्ट्रातील जागावाटप?

नकुलनाथ हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून विद्यमान खासदार आहेत. आपल्या कौटुंबिक बालेकिल्ल्यातून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जानेवारीत जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर ते आणि त्यांचे वडील कमलनाथ काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होती.

कमलनाथ यांच्या विश्वासू व्यक्तीने पक्षात आपला अपमान झाल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर या दोघांनी या अफवा फेटाळून लावल्या. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत यांनी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. जोधपूरमधून भाजपचे गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. गौरव गोगोई काँग्रेसचे दिवंगत नेते तरुण गोगोई यांचे चिरंजीव आहेत. २०१४ पासून ते लोकसभेत कालियाबोर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी आपली जागा बदलली आहे.

WhatsApp channel