मराठी बातम्या  /  elections  /  Lok Sabha Election: भाजपने कंबर कसली; राज्यात २१ हजार सभांचा धडाका, ..अशी आहे रणनिती

Lok Sabha Election: भाजपने कंबर कसली; राज्यात २१ हजार सभांचा धडाका, ..अशी आहे रणनिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 27, 2024 04:47 PM IST

Lok sabha Election 2024 : राज्यात ४५ पारचा नारा देत भाजपने जोरदार प्रचार मोहीम आखली आहे. राज्यात जवळपास २१ हजार सभांचा धुरळा उडणार आहे. याला नमो संवाद सभाअसे नाव देण्यात आले आहे.

भाजपकडून लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सभांचा धडाका
भाजपकडून लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सभांचा धडाका

उमेदवार याद्या जाहीर केल्यानंतर भाजपने आज स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, फडणवीस यांच्यासह ४० जणांचा समावेश आहे. त्यात राज्यात महायुतीच्या प्रचारासाठी २० प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे. देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिलपासून सुरू होणार असून १ जून रोजी अंतिम व सातवा टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. भाजपने यावेळी ४०० पारचा नारा देत त्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आता भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मोदी, अमित शहा, जेपी नड्डा व योगी आदित्यनाथ यांच्यासह ४० जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, अजित पवार, धनंजय महाडिक, विनोद तावडे यांच्यासह २० नेते महायुतीचा प्रचार करणार आहेत. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.

राज्यात ४५ पारचा नारा देत भाजपने जोरदार प्रचार मोहीम आखली आहे. राज्यात जवळपास २१ हजार सभांचा धुरळा उडणार आहे. याला नमो संवाद सभाअसे नाव देण्यात आले आहे. राज्यातील जवळपास ४ कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचे उदिष्ठ भाजपने ठेवले आहे. यासाठी देशातील जवळपास ३०० वक्त्यांची फौज तैनात केली जाणार आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान असल्याने तेथे प्रचार मोहीम लवकरच सुरू केली जाणार आहे. मोदी कार्यकाळाच्या आधीचा देश व मोदींच्या कार्यकाळातील देश यावर लोकांची जनजागृती केली जाणार आहे. देशातील सर्व वर्गासाठी सरकारने काय केले, याचा पाढा वाचला जाणार आहे.

नव मतदारांपर्यत पोहचण्यासाठी युवा मोर्चा घरोघरी जाऊन तरुणांची भेट घेणार आहे. कॉफी विथ युथ असे कार्यक्रम राज्यभर राबवले जाणार आहे.प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात हजारो कॉर्नर सभा घेऊन विकसित भारत, अयोध्या राम मंगिर, सीएए, काश्मीरमधील कलम ३७० हटवणे आदि मुद्दे मांडले जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघात ४०० ते ५०० कॉर्नर सभा घेण्याचे नियोजन भाजपने केले आहे.

WhatsApp channel