मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Mumbai North West Lok Sabha : जबरदस्त ट्विस्ट ! शिंदे गटाचा उमेदवार आधी हरला नंतर ४८ मतांनी विजय, उद्धव ठाकरे म्हणाले..

Mumbai North West Lok Sabha : जबरदस्त ट्विस्ट ! शिंदे गटाचा उमेदवार आधी हरला नंतर ४८ मतांनी विजय, उद्धव ठाकरे म्हणाले..

Jun 04, 2024 09:33 PM IST

mumbainorth west lok sabha result : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात यापूर्वी अमोल किर्तीकर यांचा विजय झाल्याचे समोर आले होते. त्यानंतररवींद्र वायकर यांनी फेरमतदानाची मागणी केली. त्यात ते ४८ मतांनी पुढे असल्याचे आढळले.

शिंदे गटाचा उमेदवार आधी हरला नंतर ४८ मतांनी विजय
शिंदे गटाचा उमेदवार आधी हरला नंतर ४८ मतांनी विजय

Mumbai North West Lok Sabha Result 2024 : महाराष्ट्रातील मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ (mumbai north  west ) आणि बीड मतदारसंघात अतिशय उत्कंठावर्धन सामना रंगला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेनेत सरळ लढत होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठानं विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली होती, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं रवींद्र वायकर निवडणूक रिंगणार होते. मात्र आधी पराभूत घोषित केलेले रवींद्र वायकर यांना फेरमतमोजणीत ४८ मतांनी विजय झाल्याचे जाहीर केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान याबाबत उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, या मतदानसंघातील मतमोजणीत पहिल्यापासूनच गडबड होती. तेथे टपाल मतमोजणी, अवैध ठरवलेली मते तसे इव्हीएममधील बिघाडाच्या तक्रारी आल्या होत्या. या निवडणुकीला आम्ही निवडणूक आयोगाकडे आव्हान देऊ. तसेच येथे फेरमतदान घेण्याची मागणी करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

 मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात यापूर्वी अमोल किर्तीकर यांचा विजय झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर रवींद्र वायकर यांनी फेरमतदानाची मागणी केली. त्यात ते ४८ मतांनी पुढे असल्याचे आढळले. दरम्यान, एकूण ९५४९३३९ मतदान मोजणी झाली. यात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना ४५२६४४ मतं मिळाली. तर शिवसेना उबाठाचे उमेदवार किर्तीकर यांना ४५२५९६ मतं मिळाली. फेर मतमोजणीत वायकर हे ४८ मतांनी विजयी झाल्याचं उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी घोषित केलं. 

दरम्यान राज्यामध्ये महाविकास आघाडीने मिळवलेल्या दमदार यशानंतर शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली.  सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते, ते दाखवून दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

WhatsApp channel