मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी अन् राहुल गांधी एकाच मंचावर येऊन डिबेट करणार? राहुल गांधींनी आव्हान स्वीकारलं

Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी अन् राहुल गांधी एकाच मंचावर येऊन डिबेट करणार? राहुल गांधींनी आव्हान स्वीकारलं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 11, 2024 10:32 PM IST

Modi-Rahul Gandi Public Debate: मोदींसोबत एकाच व्यासपीठावर येऊन ओपन डिबेट करण्यासाठी राहुल गांधींनी दोन न्यायाधीशांसह पत्रकाराच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मोदींनी स्वीकारल्यास दोन नेत्यांमध्ये पब्लिक डिबेट होऊ शकते.

राहुल गांधींनी मोदींसोबत डिबेटचे आव्हान स्वीकारलं
राहुल गांधींनी मोदींसोबत डिबेटचे आव्हान स्वीकारलं

Rahul Gandhi ready to face modi in public debate : काँग्रेस नेते राहुल गांधींनी शनिवारी सांगतले की, डिबेटमध्ये मोदींचा मुकाबला करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र त्यांना माहिती नाही की, याला पंतप्रधान मोदी तयार होतील की नाही. राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok sabha election) सार्वजनिक वादविवादासाठी दोन माजी न्यायाधीशांसोबत एका पत्रकाराच्या निमंत्रणाचे स्वागत करताना म्हटले की, मला व पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना अशा खुल्या चर्चेत सहभागी व्हायला आवडेल. मला आशा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीही या चर्चेत सहभाग घेण्यासाठी तयार होतील.

ट्रेंडिंग न्यूज

राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, मजबूत लोकशाहीसाठी प्रमुख पक्षांकडून आपला दृष्टिकोण देशातील जनतेसमोर ठेवणे एक सकारात्मक पाऊल असेल. पंतप्रधानांनीही या संवादात सहभागी होण्याची आशा करतो. न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) मदन बी. लोकुर,न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) अजीत पी. शाह आणि एन. राम यांनी या डिबेटसाठी पत्र लिहिले होते. त्यात म्हटले होते की, डिबेटचा प्रस्ताव निष्पक्ष आणि प्रत्येक नागरिकाच्या व्यापक हितासाठी आहे.

काँग्रेस अध्यक्षांसोबत चर्चा -
या पत्राबाबत राहुल गांधींनी म्हटले की, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी सहमती दर्शवली की, अशा प्रकारच्या डिबेटच्या माध्यमातून आपला दृष्टिकोण जनतेसमोर ठेवण्यास मदत मिळेल व ते योग्य पर्याय निवडतील. जनतेला थेट आपल्या नेत्यांच्या तोडून पक्षाची धोरणे ऐकण्याचा अधिकार आहे. यामुळे मला किंवा काँग्रेस अध्यक्षांना या डिबेटमध्ये सहभागी होण्यास आनंद होईल.

माजी न्यायमूर्ती मदन बी लोकुर, एपी शाह आणि पत्रकार एन. राम यांनी पीएम मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पब्लिक डिबेटसाठी निमंत्रित केले आहे. त्यांनी मोदी आणि राहुल गांधींच्या नावाने एक पत्र लिहिले आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, दोन्ही बाजुंनी केवळ आरोप व आव्हाने ऐकण्यात आली आहेत. कोणतेही योग्य उत्तर न आल्यामुळे त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे.

मदन बी लोकुर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आहेत, एपी शाह दिल्ली हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायमूर्ती आहेत तर एन राम वरिष्ठ पत्रकार आणि द हिंदू वृत्तपत्राचे माजी एडिटर-इन-चीफ आहेत. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याने आपल्या देशातील निवडणुकांवर संपूर्ण जगाचे लक्ष असते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी एका प्लेटफॉर्मवर येऊव खुली चर्चा करावी.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राहुल गांधी (Rahul Gandhi)  शुक्रवारी लखनऊ मध्ये राष्ट्रीय संविधान संमेलनात सहभाग घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना विचारण्यात आले की, मदन बी. लोकुर आणि मीडियातील लोकांनी तुम्हाला पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत वन टु वन डिबेट करण्यासाठी आमंत्रित केले आहे. यावर तुमचे मत काय? तुम्ही निमंत्रण स्वीकार करणार का? त्यावर राहुल गांधी म्हणाले की, मी कोणाशीही डिबेट करण्यासाठी तयार आहे. पंतप्रधानांशीही मी डिबेट करू शकतो. मात्र मला माहिती आहे. या डिबेटसाठी मोदी कधीही तयार होणार नाहीत.

राहुल गांधींनी सरकारच्या धोरणांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. रोजगाराच्या मुद्यावर त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला असून आता राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिबेटचे आव्हान स्वीकार करून राजकीय मैदानात एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. दरम्यान मोदींकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

WhatsApp channel