देशात लोकसभा निवडणुका सुरू असन तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. राहुल गांधींनी म्हटले आहे की, ४ जून रोजी जेव्हा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यानंतर सरकारी विभागांमध्ये रिक्त पडलेल्या ३० लाख पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. त्याचबरोबर राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचारापासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधीम्हणाले की, नरेंद्र मोदींच्या हातातून निवडणूक निसटली आहे. ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत.
राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स वर व्हिडियो मेसेज शेअर केला आहे. त्यासोबत लिहिले आहे की, देशातील युवकांनो! ४ जून रोजी INDIA ते सरकार स्थापन होत आहे. आमची गॅरेंटी आहे की, १५ ऑगस्टपर्यंत ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. आपल्या मुद्द्यावर ठाम रहा. INDIA चे ऐका, द्वेष नको नोकरी निवडा. राहुल गांधींनी म्हटले की, नरेंद्र मोदी स्लिप करत आहेत. ते भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत. राहुल म्हणाले की, पीएम मोदींनी निर्णय घेतला आहे की, येत्या ४ ते ५ दिवसात तुमचे लक्ष विचलित करायचे आहे. मागील तीन टप्प्यात झालेल्या कमी मतदानाचा लाभ काँग्रेसला मिळेल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
राहुल गांधी म्हणाले तुम्ही मुद्द्यांपासून भटकू नका. बेरोजगारी सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यांनी तुम्हाला २ कोटी रोजगाराचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केलं नाही. चुकीची जीएसटी लावली. नोटबंदी केली आणि अदानी अंबानीसारख्या लोकांसाठी काम केले,"अशी टीका राहुल गांधी दिली आहे.
"४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार येत आहे. आमची गॅरंटी आहे की १५ ऑगस्टपर्यंत आम्ही ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरती सुरू करणार आहोत. नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराला भुलू नका, तुमच्या मुद्द्यांवर ठाम राहा. इंडियाचा आवाज ऐका, तिरस्कार नको, नोकरीला स्विकारा... असे आवाहनही राहुल गांधी यांनी यावेळी केले.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात युवा न्यायाचे आश्वासन दिले आहे. यामध्ये काँग्रेसने देशातील जनतेला पाच गॅरंटी दिल्या आहेत. त्यात पहिली गॅरेंटी नोकऱ्यांचे आश्वासन आहे.
दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्यानंतर १५ मे रोजी मोदींचा मुंबईमध्ये भव्य रोड शो होणार आहे. त्यानंतर १७ मे रोजी त्यांची शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार असून या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.
संबंधित बातम्या