हाय गर्मी! भाषण सुरू असतानाच राहुल गांधींनी पाण्याची बाटली डोक्यावर ओतली, पाहा VIDEO-lok sabha election congress leader rahul gandhi pouring water on his head in rally ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  हाय गर्मी! भाषण सुरू असतानाच राहुल गांधींनी पाण्याची बाटली डोक्यावर ओतली, पाहा VIDEO

हाय गर्मी! भाषण सुरू असतानाच राहुल गांधींनी पाण्याची बाटली डोक्यावर ओतली, पाहा VIDEO

May 29, 2024 12:11 AM IST

Rahul Gandhi :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एका रॅलीत उकाड्यापासून बचावासाठी पाण्याची बाटली आपल्या डोक्यावर ओतून घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल गांधींनी पाण्याची बाटली डोक्यावर ओतली, पाहा VIDEO
राहुल गांधींनी पाण्याची बाटली डोक्यावर ओतली, पाहा VIDEO

Rahul Gandhi Pouring Water : देशभरात उष्णतेची लाट आली असून लोकसभेच्या प्रचारात व्यस्त असलेल्या नेत्यांनाही याचा त्रास होऊ लागला आहे.उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एका रॅलीत उकाड्यापासून बचावासाठी पाण्याची बाटली आपल्या डोक्यावर ओतून घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अखिलेश यादवही व्यासपीठावर उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने तुम्हाला बेरोजगार बनवले आहे. इंडिया आघाडी सत्तेत येताच तुम्हाला ३० लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील. बेरोजगारांच्या बँक खात्यात पैसेही जमा केले जातील. खटाखट,खटाखट,खटाखट.भाषण सुरू असताना राहुल गांधी यांना कडक उन्हाचा सामना करावा लागला.भाषण देतानाच त्यांनी समोर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतून पाणी प्यायले व राहिलेले पाणी आपल्या डोक्यावर ओतले. त्यानंतर काँग्रेस नेते म्हणाले की, खूप गर्मी आहे.त्यावर सभेसाठी आलेल्या लोकांनी टाळ्या वाजवत राहुल गांधी यांच्या कृतीचं स्वागत केलं. राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एवढ्या कडक उन्हात निवडणुका घेऊन भाजपने आम्हाला आणि तुम्हाला अडचणीत आणले आहे. उन्हाळ्यात निवडणुका घेतल्या असतानाही भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागणार आहे,असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला टोला लगावला.

उत्तर प्रदेशमधील देवरियामधील एका रॅलीला संबोधित करताना राहुल गांधींनी दावा केला की, मोदींना देवाने शेतकरी व मजुरांची सेवा करण्यासाठी पाठवले नाही. तर अदानींची सेवा करण्यासाठी पाठवले आहे. राहुल गांधी म्हणाले की, सर्व लोक जैविक आहेत. आपल्या आई-वडिलांपासून जन्मले आहेत. मात्र मोदी जैविक नाहीत. त्यांना त्यांच्या परमात्म्याने अंबानी आणि अदानींची मदत करण्यासाठी पाठवले आहे. मात्र परमात्म्याने त्यांना शेतकरी व मजुरांची मदत करण्यास पाठवले नाही.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार -

जवळपास दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या देशातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. त्यांनी देशभरात शेकडो सभा घेतल्या आहेत. आता प्रचाराची सांगता झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी दौऱ्यावर जाणार असून तिथं ध्यानधारणा करणार आहेत.

Whats_app_banner