पुढील महिन्यात १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या १८ व्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज, शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. तर ४ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत ९६.८ कोटी नागरिक मतदानासाठी पात्र असणार आहे. यात ४७.१ कोटी महिलांचा समावेश आहे.
राजस्थान: राजस्थानात लोकसभेची निवडणूक पहिल्या दोन टप्प्यात होणार आहे. १९ एप्रिल २०२४ आणि २६ एप्रिल २०२४ अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
महाराष्ट्रः महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात लोकसभेचं मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या तारखांना महाराष्ट्रात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात एकूण ४८ मतदारसंघ आहेत.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी अशा एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत एकूण सात लोकसभा मतदारसंघ आहेत. येथे एकाच टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे.
मध्य प्रदेश: येथे १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे आणि १३ मे २०२४ या चार टप्प्यात मतदान होणार आहे.
मणिपूर : ईशान्येकडील मणिपूरमध्ये १९ आणि २६ एप्रिल या दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.
कर्नाटकः येथे २६ एप्रिल आणि ७ मे २०२४ या दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
पंजाब: पंजाबमध्ये १ जून २०२४ रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात १ जून रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
ओडिशा : येथे लोकसभेच्या २१ आणि विधानसभेच्या १४७ जागांसाठी १३ मे , २० मे, २५ मे आणि १ जून या चार टप्प्यांत मतदान होणार आहे.
झारखंड : १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून या चार टप्प्यात मतदान होणार आहे.
हरयाणा : येथे २५ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
उत्तराखंड : १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
पश्चिम बंगालः १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी सात टप्प्यात मतदान होणार आहे.
आसामः १९ एप्रिल, २६ एप्रिल आणि ७ मे अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे.
गुजरातः ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
तामिळनाडूः येथे १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
आंध्र प्रदेश: राज्यात १३ मे रोजी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहेत.
अरुणाचल प्रदेश : राज्यात लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूकही होणार आहे. येथे दोन्ही निवडणुका एकाच टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहेत.
बिहारः १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी सात टप्प्यात मतदान होणार आहे.
छत्तीसगडः १९ एप्रिल, २६ एप्रिल आणि ७ मे २०२४ अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे.
गोव्यात ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
केरळ : २६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान
मेघालय : १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार
मिझोराम : १९ एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार
नागालँड : राज्यात १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार
सिक्कीम : राज्यात १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
तेलंगणा : राज्यात १३ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे
त्रिपुरा : १९ एप्रिल आणि २६ एप्रिल या दोन टप्प्यात मतदान होणार.
अंदमान-निकोबार मध्ये १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार
चंदीगड : १ जून रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार
दादरा आणि नगर हवेली आणि दमण-दीव : ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार
जम्मू-काश्मीर : १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे अशा एकूण पाच टप्प्यात मतदान होणार
लडाख : २० मे रोजी एका टप्प्यात मतदान होणार
लक्षद्वीप : १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार
पुद्दुचेरी : १९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार