Lok Sabha Election : नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात ईव्हीएमवरील काँग्रेसच्या चिन्हावर चिकटपट्टी लावल्याची तक्रार-lok sabha election 7th phase voting cello tape was pasted on congress symbol in varanasi alleges opposition ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Election : नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात ईव्हीएमवरील काँग्रेसच्या चिन्हावर चिकटपट्टी लावल्याची तक्रार

Lok Sabha Election : नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात ईव्हीएमवरील काँग्रेसच्या चिन्हावर चिकटपट्टी लावल्याची तक्रार

Jun 01, 2024 03:17 PM IST

Lok Sabha Election 7th phase voting : वाराणसी लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांतील ईव्हीएमवर काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर चिकटपट्टी लावण्यात आल्याची तक्रार विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Lok Sabha Election : नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या चिन्हावर चिकटपट्टी लावल्याची तक्रार
Lok Sabha Election : नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या चिन्हावर चिकटपट्टी लावल्याची तक्रार

Lok Sabha Election 7th phase voting : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यासाठी आज विविध राज्यांत मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतही आज मतदान होत आहे. याच मतदारसंघातून गडबड आणि गोंधळाच्या काही बातम्या येत आहेत. या मतदारसंघातील काही मतदानकेंद्रावर ईव्हीएमवरील काँग्रेसच्या चिन्हावर चिकटपट्टी लावण्यात आल्याची तक्रार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या मतदारसंघात काँग्रेसच्या अजय राय यांनी आव्हान दिलं आहे. समाजवादी व काँग्रेसची युती असल्यानं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. वाराणसीच्या रोहनिया विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक १९१, १९२ आणि १९३ वर निवडणूक अधिकाऱ्यांनी हेराफेरी केल्याचा आरोप समाजवादी पक्षानं केला आहे. या बूथवर काँग्रेस पक्षाचं चिन्ह असलेल्या पंजाच्या बटणावर टेप चिकटवण्यात आली आहे. त्यामुळं मतदारांना काँग्रेसला मतदानच करता येत नसल्याचा दावा समाजवादी पक्षानं केला आहे. ही गंभीर बाब असून लोकशाहीला धोका असल्याचं समाजवादी पक्षानं म्हटलं आहे. वाराणसीत आज सकाळी ११ वाजेपर्यंत २६.४८ टक्के मतदान झालं.

उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघ हा देशातील अतिमहत्त्वाचा मतदारसंघ आहे. या जागेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींसह एकूण सात उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या आघाडीचे उमेदवार अजय राय यांच्या नावाचाही समावेश आहे.

अजय राय (काँग्रेस-सपा आघाडीचे उमेदवार)

पंतप्रधान मोदींना निवडणुकीच्या मैदानात आव्हान देण्यासाठी केवळ सहा उमेदवार रिंगणात आहेत. यातील पहिलं नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांचं आहे, ते इंडिया आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत.

अतहर जमाल लारी (बहुजन समाज पार्टी)

बहुजन समाज पक्षानं इथून अतहर जमाल लारी (७०) यांना उमेदवारी दिली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सपाला पाठिंबा दिला होता आणि आता ते बसपकडून निवडणूक लढवत आहेत.

कोलिसेट्टी शिव कुमार (युग तुलसी पक्ष)

युग तुलसी पक्षाचे कोलिसेट्टी शिवा कुमार हे मूळचे हैदराबादचे आहेत आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमचे माजी बोर्ड सदस्य आहेत. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करणं हा त्यांचा निवडणुकीचा मुद्दा आहे.

गगन प्रकाश यादव (अपना दल कामेरवाडी)

अपना दल कामेरवाडीचे गगन प्रकाश यादव वाराणसी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत आणि ते पीडीएम (मागास, दलित आणि मुस्लिम) चा नारा देत आहेत. त्यांना असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे.

दिनेश कुमार यादव आणि संजय कुमार (अपक्ष उमेदवार)

दिनेशकुमार यादव आणि संजय कुमार तिवारी हे दोन अपक्ष उमेदवारही वाराणसीमधून निवडणूक लढवत आहेत.