Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे यांच्या बेधडक मुलाखतीचा टीझर सोशल मीडियावर लॉन्च!
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे यांच्या बेधडक मुलाखतीचा टीझर सोशल मीडियावर लॉन्च!

Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे यांच्या बेधडक मुलाखतीचा टीझर सोशल मीडियावर लॉन्च!

May 09, 2024 04:30 PM IST

Uddhav Thackeray Meeting Teaser Released: संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची नुकतीच घेतलेल्या मुलाखतीचा टीझर लॉन्च झाला.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. तर, राज्यात चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी अनुक्रमे १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला. निवडणुकांच्या महाभारतात नवे वादळ, असे टीझरला नाव देण्यात आले.

Devendra Fadnavis: धुळ्यात देवेंद्र फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, प्रलंबित प्रश्नांवरून आदिवासी, कोळी बांधव आक्रमक!

सामना वृत्तपत्राने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीझर लॉन्च केला. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच रविवारी १२ मे २०२४ सकाळी ०८.०० वाजता प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीच्या टीझरमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदी आणि अमित शाह वारंवार महाराष्ट्रात येत आहेत, आणि त्यांचं पहिल्या क्रमाकांचं टार्गेट हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार असल्याचे बोलत आहेत. यावर उद्धव ठाकरे लोकशाहीचं वस्त्रहरण होत आहे, अशी प्रतिक्रिया देत आहेत.

Lok Sabha Election 2024: २५६१ मतदान केंद्र, २३.७२ लाख मतदार आणि चोख बंदोबस्त; बारामती लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान!

उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

उद्धव ठाकरे यांनी मावळ येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत मोदींचा समाचार घेतला."ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहचवले, त्यांनाच तुम्ही नकली शिवसेना म्हणता. तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीत वार केला आहे. प्रेमाने अलिंगन दिले, तर आम्हीही देवू. पण पाठीत वार केला तर, वाघनखाने पलटवार करू", असे उद्धव ठाकरे म्हणाले. "लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. मात्र, या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त नरेंद्र मोदी राहतील. यावेळी इंडिया आघाडीचा पंतप्रधान होईल. मोदींना काल बोललेले आज आठवत नाही. अच्छे दिन म्हणत १५ लाख खात्यात येतील, असे म्हटले होते. पण हे पैसे भाजपच्या खात्यात गेले", असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Whats_app_banner