Kalyan lok sabha: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अयोध्या पौळ मैदानात?, सोशल पोस्ट व्हायरल
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Kalyan lok sabha: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अयोध्या पौळ मैदानात?, सोशल पोस्ट व्हायरल

Kalyan lok sabha: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून अयोध्या पौळ मैदानात?, सोशल पोस्ट व्हायरल

Apr 01, 2024 04:20 PM IST

Kalyan Lok Sabha :अयोध्या पौळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उद्धवजी ठाकरे यांच्या आशिर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडून कल्याण लोकसभा लढवत आहे.

श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून अयोध्या पौळ मैदानात?
श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून अयोध्या पौळ मैदानात?

राज्यात लोकसभाची रणधुमाळी सुरू असून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम ट्प्प्यात आहे. राज्यातील काही जागांवर उमेदवार जाहीर झाले नसल्याने इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गट कल्याणमधून कोणाला उतरवणार, याची उत्सुकता असताना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, कल्याणमधून मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असल्याचे म्हटले आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांनी उधाण आले आहे.

अयोध्या पौळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उद्धवजी ठाकरे यांच्या आशिर्वादाने मशाल चिन्हावर शिवसेनेकडूनकल्याण लोकसभा लढवत आहे.

ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद साहेब. त्याचबरोबर आदित्य ठाकरे, संजय राऊत, वरुण सरदेसाई, साईनाथजी दुर्गे आदि नावांचा उल्लेख या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.

 

अयोध्या पोळ यांनी केलेले ट्विट
अयोध्या पोळ यांनी केलेले ट्विट

या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असताना १ एप्रिल रोजी ही पोस्ट व्हायरल होत असल्याने यावर एप्रिल फुल अशा कमेंटही होत आहेत. ही पोस्ट एप्रिल फुलसाठी केली असल्याचे नेटीझन्स म्हणत आहेत.

कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून याआधी सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुभाष भोईर, केदार दिघे आदि नावे चर्चेत होती. मात्र आता अयोध्या पोळ यांचं नाव समोर आल्याचं दिसत आहे. अयोध्या पोळ यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता. त्याच्यांशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान दुपारनंतर  अयोध्या पोळ यांनी ही पोस्ट डिलिट केली. त्यामुळे हा एप्रिल फुल करण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

Whats_app_banner