मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Amethi lok sabha : अमेठीतून गांधी कुटूंबाचा उमेदवार ठरला!, स्मृती इराणींना देणार कडवी टक्कर

Amethi lok sabha : अमेठीतून गांधी कुटूंबाचा उमेदवार ठरला!, स्मृती इराणींना देणार कडवी टक्कर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 05, 2024 10:58 AM IST

Amethi Lok sabha Constituency : काँग्रेसने अमेठीतून अद्याप उमेदवाराची घोषणा केली नाही. येथून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या एका विधानाने नवा ट्विस्ट आला आहे.

अमेठीतून गांधी कुटुंबाचा उमेदवार ठरला!
अमेठीतून गांधी कुटुंबाचा उमेदवार ठरला!

लोकसभा निवडणूक २०२४ चा (Loksabhaelection 2024) बिगुल वाजला असून राजकीय पक्षांनी आपआपले मोहरे निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. दरम्यान उत्तरप्रदेशातील व्हीआयपी मतदारसंघांपैकी एक असलेल्या अमेठी (Amethi Lok sabha Constituency) आणि रायबरेली जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. या दोन्ही जागांवर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र मागील लोकसभा निवडणुकीत स्मृती इरानींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठीतून पराभूत केले होते तर रायबरेली मतदारसंघातून सध्या सोनिया गांधी खासदार आहे. मात्र यावेळी त्या लोकसभा निवडणूक लढवत नाहीत. त्यामुळे या दोन्ही जागांवर काँग्रेस कोणाला उतरवणार याची उत्सूकता लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा (robert Vadra) यांचे एक विधान समोर आले आहे. न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या एका मुलाखातीत वाड्रा यांनी म्हटले की, अमेठीतील जनतेची इच्छा आहे की, मी येथून निवडणूक लढावी. मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे. मागील अनेक वर्षे गांधी कुटूंबाने रायबरेलीवअमेठी मतदारसंघात मेहनत केली आहे. अमेठीतील लोक विद्यमान खासदारांवर नाराज आहे. त्यांना वाटते की, खासदार (स्मृती इराणी) ला निवडून चूक केली.

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून अमेठीतून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची उत्सूकता लागली असून अजूनही ती कायम आहे. राहुल गांधी येथून निवडणूक लढवणार की नाही याबाबत काही निश्चित नाही. प्रियांका गांधी येथून निवडणूक लढवणार अशी शक्यता असतानाच आता आणखी एक नाव पुढे आले आहे. 

प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, विद्यमान खासदारांवरअमेठीचे लोक खूप नाराज आहेत. लोक म्हणतात की राहुल गांधींना पराभूत करून त्यांनी चूक केली. अमेठीच्या जनतेची इच्छा आहे की मी माझ्या राजकीय करिअरची सुरूवात तेथून करावी. मी राजकारणात पहिले पाऊल टाकले तर ते अमेठीतून टाकावे. अमेठीची प्रतिनिधित्व करावे. मला खासदार व्हायचे असेल तर अमेठीला माझा मतदारसंघ बनवावा. रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, १९९९ मध्ये प्रियांका गांधी यांच्यासोबत अमेठीमध्ये प्रचारासाठी गेलो होतो. त्यावेळचे राजकारण खूप वेगळे होते. आम्ही रात्रभर निवडणुकीच्या कामासाठी फिरत होतो. कार्यकर्त्यांसोबत रात्रंदिवस मेहनत घेतली.

अमेठीच्या जनतेला वाटते की,गांधी घराण्यातील कोणीतरी तिथून निवडूक लढावी. मी ज्यांच्यासोबत काम केले ते आजही मला सोशल मीडियावरून संपर्क साधतात, मेसेज पाठवतात, माझ्या वाढदिवसाला केक कापतात आणि लोकांना लंगर देतात. त्यांना माहिती आहे की, मला देशसेवा करायला आणि समाजासाठी काहीतरी करायला आवडते.

WhatsApp channel