मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ravindra Dhangekar: भाजपनं लोकशाहीची हत्या केली, रवींद्र धंगेकर यांचं पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

Ravindra Dhangekar: भाजपनं लोकशाहीची हत्या केली, रवींद्र धंगेकर यांचं पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 12, 2024 11:50 PM IST

Ravindra Dhangekar Protest: पुण्यात रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पैसे वाटत असल्याचा रवींद्र धंगेकर यांनी आरोप केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पैसे वाटत असल्याचा रवींद्र धंगेकर यांनी आरोप केला.

Pune: पु्ण्यात लोकशाहीची हत्या करणारा प्रकार सुरू आहे, अशा शब्दात पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी संताप व्यक्त केला. पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या (Sahakar Nagar Police Stations) हद्दीतील झोपडपट्टी परिसर आणि अन्य परिसरात भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होत आहे. याबाबत तक्रार दाखल केली तर पोलीस कुठलीही कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप करत धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठिय्या आंदोलन केले.

ट्रेंडिंग न्यूज

यावेळी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा धंगेकर यांनी घेतला. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची नावे सांगूनही त्यांच्यावर कसलीही कारवाई पोलीस करत नसल्याने सहकारनगर पोलीस ठाण्यातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवारी ठिय्या आंदोलन केले. रवींद्र धंगेकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर जमले.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, घराघरात पैसे वाटले जात आहेत. विविध मार्गाने जनतेचा हडप केलेला पैसा या निवडणुकीत वापरून जिंकू, असे भाजपला वाटत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जात आहेत. आजी-माजी नगरसेवक यांच्यापासून ते भाजपचे वरिष्ठ नेते यात गुंतले आहेत. याची माहिती आम्ही पोलिसांना दिली. पैसे वाटणाऱ्यांची नावे सांगितली. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही गप्प राहणार नाही. आम्हाला लोकशाही वाचवायची आहे. आम्हाला संविधान वाचवायचे आहे. निवडणुका पैसे वाटून नव्हे तर लोकशाही पद्धतीने व्हाव्यात, हीच आमची भूमिका आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान

महाराष्ट्रात उद्या चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे, ज्यात पुणे लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याशिवाय, नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड मतदारसंघातही उद्या (१३ मे २०२४) मतदान होणार आहे.

WhatsApp channel