मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Prakash Ambedkar : मतदानाचे फॉर्म 17C रेकॉर्ड का अपलोड करत नाही? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाला सवाल

Prakash Ambedkar : मतदानाचे फॉर्म 17C रेकॉर्ड का अपलोड करत नाही? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाला सवाल

May 24, 2024 11:22 PM IST

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एका निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.तुम्ही मतदान केलेल्या मतदानाचे फॉर्म १७ सी रेकॉर्ड का अपलोड करत नाही आहात?असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा
प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा

Prakash Ambedkar : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पाच टप्प्यात पूर्ण झाली आहे. आता देशातील काही ठिकाणी दोन टप्प्याचे मतदान बाकी असून ०४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल लागणार आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एका निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.तुम्ही मतदान केलेल्या मतदानाचे फॉर्म १७ सी रेकॉर्ड का अपलोड करत नाही आहात? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रकाश आंबेडकरांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी करत म्हटले आहे की, नियम ४९ (एस) अंतर्गत प्रत्येक पीठासीन अधिकऱ्याने मतदान पूर्ण झाल्यानंतर उपस्थित असलेल्या प्रत्येक पोलिंग एजंटला फॉर्म १७ सी मध्ये तयार केलेल्या मतांच्या खात्याची खरी साक्षांकित प्रत देणे आवश्यक नाही का?पीठासीन अधिकाऱ्याने खात्याच्या प्रती प्रत्येक पोलिंग एजंटला न मागता देणे आवश्यक नाही का?

आंबेडकर यांनी म्हटले आहे की, माझ्याकडे प्रत्येक बुधवर झालेल्या एकूण मतांच्या प्रती आहेत. तुम्ही अन्यायकारक भूमिका बजावत असल्याने मी आणि अकोल्यातील माझे सहकारी लवकरच मतांची आकडेवारी अपलोड करणार आहोत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्य लढत आहे. महाआघाडीतउद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. तर, महायुतीत भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. मात्र राज्यात वंचितला ४८ पैकी ३ जागांवर विजय मिळणार असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केली आहे.

एका वृत्तसमुहाशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. आंबेडकर म्हणाले की, प्रचारसभेतून मोदी विरोधकांवर वैयक्तिक हल्ले करत आहेत, हे खूप वाईट आहे. पंतप्रधानांमुळे पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा खालावली आहे. सत्ताधारी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा गैरवापर करतो, हे या निवडणुकीच्या माध्यमातून दिसले आहे.

त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीचे रूपांतर ग्रामपंचायती सारख्या स्थानिक निवडणुकीसारखे केले आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक लोकसभेच्या जवळपास सर्वच मतदारसंघात प्रचार करतात. विधानसभा निवडणुकीतही तेच प्रचाराला जातात. स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही मोदीच प्रचारक असतात.

WhatsApp channel