Lok Sabha election results 2024 : देशातील दिग्गज नेते शरद पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी वेगानं सुरू आहे. चौथ्या फेरीअखेर शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे तब्बल १९ हजार मतांनी आघाडीवर आहेत. अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा केल्यापासून काका-पुतणे सामने आले होते. अजित पवार यांनी पक्ष आणि पक्ष चिन्ह ताब्यात घेतल्यानंतरही शरद पवार यांनी मैदान सोडलं नाही. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी स्वत:च्या पत्नीला उमेदवारी देऊन थेट शरद पवार यांनाच आव्हान दिलं होतं. त्यामुळं इथली निवडणूक लक्षवेधी ठरली होती.
आता बारामतीची मतमोजणी सुरू आहे. पहिल्या चार फेरीअखेर सुप्रिया सुळे यांनी १९ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळं इथला अंतिम निकाल काय लागतो याकडं लक्ष लागलं आहे.
दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तो खरा ठरतो की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
संबंधित बातम्या