मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raj Thackeray: राज ठाकरे तब्बल १९ वर्षांनी आनंदाश्रमात, आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर नतमस्तक!

Raj Thackeray: राज ठाकरे तब्बल १९ वर्षांनी आनंदाश्रमात, आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर नतमस्तक!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 12, 2024 09:37 PM IST

Lok Sabha Election 2024: महायुतीच्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात सभा होत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा होत आहे. (Hindustan Times)

Mahayuti Sabha Today: महायुतीच्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (१२ मे २०२४) ठाण्यात (Thane) सभा होत आहे. या सभेपूर्वी राज ठाकरे टेंभी नाका (Tembhi Naka) येथील आनंद आश्रमात (Anand Ashram) दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. शिवसेना (Shiv Sena) सोडल्यानंतर आणि मनसेच्या (MNS) स्थापनेनंतर प्रथमच राज ठाकरे आनंदाश्रामात गेले.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभा निवणुकीला सुरुवात होण्यापूर्वीच राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच महायुतीच्या उमेदवारांसाठी निवडणूक सभा घेत आहेत. महायुतीने ठाणे लोकसभा मतदार संघ आणि कल्याण मतदारसंघासाठी अनुक्रमे नरेश म्हस्के आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. याच उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज ठाण्यात दाखल झाले. यामुळे ठाण्यात शिवसेना- मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले.

याआधी राज ठाकरे यांनी महायुतीचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. यानंतर राज ठाकरे आज नरेश म्हस्के आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ठाण्यात दाखल झाले आहेत. याआधी राज ठाकरे टेंभी नाका येथील आनंद आश्रमात दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. तब्बल १९ वर्षानंतर राज ठाकरेंनी आनंदाश्रामात भेट दिली.

ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे (शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष) यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. तर, कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीने वैशाली दरेकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. वैशाली दरेकर या देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या आहेत.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हे महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत. तर, भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे महायुती म्हणून लढत आहेत.

WhatsApp channel