मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना; अन् शरद पवार यांच्याबाबत म्हणाले...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना; अन् शरद पवार यांच्याबाबत म्हणाले...

May 17, 2024 08:44 PM IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडली.

दादरच्या शिवाजी पार्कवर नुकतीच महायुतीची सभा पार पडली.
दादरच्या शिवाजी पार्कवर नुकतीच महायुतीची सभा पार पडली.

Raj Thackeray News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या शिवाजी पार्कवर महायुतीची जाहीर सभा होत आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर आले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी मोदींच्या कामाचे कौतूक केले. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी,असा उल्लेख करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. नरेंद्र मोदी हे बरोबर २१ वर्षांनी शिवतीर्थावर आले. त्यावेळेस आपण कमळातून बाहेर आला होतात आणि २०१४ ला आपण कमळाला बाहेर काढले, असेही राज ठाकरे म्हणाले.

ट्रेंडिंग न्यूज

राज ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

२०१४-२०१९ च्या मोदीजींच्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यंतचं बोलूया. इथल्या वक्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवले. माझ्या मते त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. कारण ते सत्तेत येणार नाही. पण २०१९ ते २०२४ काळात मोदीजींनी जी कामं केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो.

राज ठाकरेंकडून मोदींच्या कामाचे कौतूक

मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राममंदिर उभं राहिलं. काश्मीरला विशेष दर्जा देणारा ३७० कलम तुमच्यामुळेच हटवलं गेलं. काश्मीर भारताचा भाग आहे हे ३७० कलम घटनेनंतर भारतीयांना पहिल्यांदा वाटू लागले. शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता. पण, राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदीजींनी याच पीडित मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकमधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कायमचा दूर झाला. त्याबद्दल तुमचं अभिनंदन, असेही राज ठाकरे म्हणाले.

देशात अनेक चांगले-देशभक्त मुसलमान- राज ठाकरे

पुढे राज ठाकरे म्हणाले की, "आज देशात अनेक चांगले-देशभक्त मुसलमान आहेत, जे देशाच्या प्रगतीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना आश्वस्त करा, पण मोहल्ल्यांमध्ये राहणारे, ओवेसीसारख्यांच्या मागे फिरणारा जो मुसलमान आहे त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये आपले पोलीस घुसवून तिथे ज्या देशविघातक कारवाया सुरु आहेत त्यावर कायमचा चाप बसवा."

मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्या- राज ठाकरे

माझी शेवटची मागणी म्हणजे मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्या, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या, असेही राज ठाकरे म्हणाले.

WhatsApp channel