मराठी बातम्या  /  elections  /  lok sabha election 2024 live updates : महाविकास आघाडीची बैठक संपली, नाना पटोले म्हणाले…

lok sabha election 2024 live updates : महाविकास आघाडीची बैठक संपली, नाना पटोले म्हणाले…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 21, 2024 03:59 PM IST

lok sabha election 2024 live updates : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेलं जागावाटप, उमेदवार निश्चिती, आरोप-प्रत्यारोप, नाराजी, मनधरणी या सगळ्यांच्या संदर्भातील ताज्या घडामोडींसाठी…

lok sabha election 2024 live : महाविकास आघाडीची बैठक संपली, नाना पटोले म्हणाले…
lok sabha election 2024 live : महाविकास आघाडीची बैठक संपली, नाना पटोले म्हणाले…

lok sabha election 2024 live updates : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यासाठी महिना उरला असतानाही प्रमुख पक्षांचं जागावाटप झालेलं नाही. अनेक उमेदवारांची घोषणाही झालेली नाही. यावर निर्णय घेण्यासाठी रोजच्या रोज बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पक्षांतराच्या बातम्या येत आहेत. आरोप-प्रत्यारोप, नाराजी, मनधरणी सुरू आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी लोकसभा निवडणुकीच्या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे.

जाणून घ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील क्षणोक्षणीच्या घडामोडी…

 

> गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जातात, मग महाराष्ट्रात पाच टप्प्यात का? सरकार भाजपचंच आहे, मग भीती कसली? त्यांना भीती पराभवाची आहे. त्यामुळंच हे सर्व सुरू आहे - नाना पटोले

> सांगलीच्या जागेची चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही - नाना पटोले

> प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची आहे. त्यानुसारच काँग्रेस हायकमांड निर्णय घेत आहे - नाना पटोले

> महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद

> मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची आज बैठक. मनसेला सामावून घेण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

> काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा-गोंदियातून निवडणूक लढणार, सूत्रांची माहिती

> काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता. रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत.

> विजय शिवतारे यांच्या टीकेला अजित पवार यांचं प्रथमच उत्तर. आम्ही देखील आरे ला कारे करू शकतो. मात्र महायुतीमधील वातावरण खराब होऊ नये म्हणून शांत आहोत - अजित पवारांचा इशारा

> आमदार अभिजित अडसूळ यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत.

> एनडीएचा आयपीओ लाँच झाला आहे. तो ओव्हरसबस्क्राइब झाला आहे आणि तो ४०० पार जाईल; आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीच्या आयपीओ लाँचिंग प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

> अजित पवारांना आव्हान देणारे विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम. मात्र, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

> प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

> राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांची शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज बैठक होत आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची चिन्हं आहेत.

> लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात व देशात राजकीय घडामोडींना वेग. भेटीगाठी आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू

WhatsApp channel