Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सातारा (Satara) दौऱ्यावर आहे. साताऱ्यातील रतय शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात आज थोर समाजसुधारक तथा रयत संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांची ६५वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली, जिथे शरद पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिस्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३०-३५ जागा मिळणार असल्याचे वक्तव्य केले.
शरद पवार म्हणाले की, "देशात तीन टप्प्यात झालेले मतदान मोदींना अस्वस्थ करणारे आहे. लोक भाजपपासून दूर जात असल्याची त्यांना जाणीव झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे."
देशात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपल्यानंतर मोदींनी आपला स्वर बदलला. यानंतर त्यांनी मुस्लीम समाजाचा उघडपणे उल्लेख केला. मोदींना असे वाटत असावे की, धर्मांध विचार घेऊनच मदत होऊ शकते. जसजसे निवडणुकीचे टप्पे पुढे जात आहे, तसेतसे मोदींचे स्थान संकटात जात आहे, अशी भावना भाजप नेत्यांमध्ये असावी, असे माझे निरीक्षण असल्याचे शरद पवार म्हणाले.
२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला एक, राष्ट्रवादी काँग्रेसला चार आणि एमआयएमला एक अशा सहा जागा विरोधकांना मिळाल्या. मात्र, असे चित्र दिसत आहे की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील. जनतेकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला समर्थन मिळत आहे, असेही शरद पवार म्हणाले. मात्र, जनतेचा कौल कोणाच्या बाजूने, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या