Maha Vikas Aghadi joint Press Conference Live : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप अद्याप संपलेलं नाही. तर, काही ठिकाणी उमेदवारीवरून संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर करण्यात आला. पाहूया निवडणुकीच्या संदर्भातील इतर महत्त्वाच्या घडामोडी
> आतापर्यंत लेकाला निवडून दिलं. वडिलांना निवडून दिलं. लेकीला निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या. म्हणजे सगळे खूष - अजित पवार
> बारामतीमध्ये १०० टक्के कामं मी केली आहेत. आता माझ्या कामाचं श्रेय इथल्या खासदार घेत आहेत. आतापर्यंत पवारांच्या पाठीशी उभे राहिलात. उद्याच्याला देखील पवार नाव दिसेल तिथं मतदान द्यायचं - अजित पवार
> अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरित्या माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही - श्रीकांत शिंदे
> आमचं काय चुकलं? आता लढायचं, जनतेच्या कोर्टात… विशाल पाटील समर्थकांचे पोस्टर झळकले!
> महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर सांगलीतील इच्छुक उमेदवार विशाल पाटील व आमदार विश्वजीत कदम नॉट रिचेबल. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता.
> उत्तर मुंबई काँग्रेसनं लढावी की शिवसेनेनं ही चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. मात्र दिवस निघून चाललेले असल्यामुळं विनोद घोसाळकर यांनी प्रचार सुरू केला होता. आता उत्तर मुंबई काँग्रेसला गेली आहे. घोसाळकर हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यामुळं कुठलीही अडचण नाही - उद्धव ठाकरे
> सूर्यग्रहण, अमावस्या आणि मोदींचं भाषण असा योग कदाचित पहिल्यांदाच आला असावा; उद्धव ठाकरे यांची खोचक टीका
> खंडणीखोर पक्षाच्या नेत्यानं शिवसेनेला नकली म्हणणं हे योग्य नाही - उद्धव ठाकरे
> अमित शहा बाळासाहेबांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला आले होते तेव्हा मीच शिवसेना पक्षप्रमुख होतो. ते आता विसरले असतील, पण लोक विसरलेले नाहीत - उद्धव ठाकरे
> बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा कदाचित नरेंद्र मोदी हिमालयात असतील. महाराष्ट्राबाहेरच्या कोणी तरी येऊन मराठी माणसांना सांगायचं की असली आणि नकली शिवसेना कोणती हे म्हणजे खूप झालं - उद्धव ठाकरे
> महाविकास आघाडी अधिकाधिक व्यापक कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न केला. आमच्या प्रत्येक सहकाऱ्यांनी त्यासाठी सहकार्य केलं. प्रकाश आंबेडकरही सोबत यावेत असा आमचा प्रयत्न होता. दुर्दैवानं तसं झालं नाही - उद्धव ठाकरे
> शेतकरी सुखी नाही. गरीब सुखी नाही आणि मोदींच्या नावावर कसली मतं मागताय? कसासाठी मतं द्यायची - नाना पटोले
> ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. लोक सगळं बघत आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा-पुन्हा हिंदू-मुस्लिमांवरच बोलत आहेत. जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे - नाना पटोले
> सांगली ठाकरेंच्या शिवसेनेकडेच. तर, भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार
> राज्यातील ४८ पैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीत मतभेद नाहीत - शरद पवार
> शिवसेना २१ जागा लढणार. जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, बुलढाणा, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम मुंबई, मुंबई ईशान्य
> राष्ट्रवादी काँग्रेस १० जागा लढणार. बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड
> महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १७ जागा लढणार. नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई
> आजचा दिवस इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवणारा ठरेल - जयंत पाटील
> महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील करतायत प्रास्ताविक
> महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचीही उपस्थिती.
> महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात.
> मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश
> पत्रकार परिषदेच्या आधी शिवालय इथं महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड हे नेते उपस्थित
> थोड्याच वेळात सुरू होणार महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद
> पंकजा मुंडे यांच्या पक्षाचं सरकार आहे. त्यांनी आरक्षण दिलं तर मी निवडणुकीतून माघार घेऊन पंकजा मुंडे यांना बिनविरोध निवडून देईन - बजरंग सोनवणे
> भाजप संविधानात कोणताही बदल करणार नाही. विरोधक चुकीचा प्रचार करत आहेत - अशोक चव्हाण
> महायुतीमध्ये ज्या जागांवर नाराजी आहे, तिथं नेते एकत्र बसून निर्णय घेतील - अजित पवार
> निवडणूक म्हटलं की नाराजी असतेच. समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो. बारामतीमध्येही वेगळं काही नाही. शेवटी प्रत्येकाचा निर्णय असतो - अजित पवार
> मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, अशी राज ठाकरे यांची काही वर्षांपूर्वी भूमिका होती. आता काय होतंय ते पाहू; खासदार संजय राऊत यांचा चिमटा
> राज ठाकरे भाजपसोबत जाणार की स्वतंत्र निवडणूक लढणार, आज भूमिका जाहीर करणार
> छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाकडं लक्ष
> सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. ती जागा नेमकी कोणाकडे राहणार? शिवसेना माघार घेणार की काँग्रेस तडजोड करणार? याचं उत्तर आज मिळणार
> उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले आजच्या पत्रकार परिषदेला संबोधित करणार
> महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद